इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या मोरबी नदीत अक्षरशः मृत्यूचे तांडव झाल्याची आणि अतिशय गंभीर दुर्घटना समोर आली आहे. मोरबी परिसरातील मच्छू नदीवरील पूल कोसळला. या पुलावर छटपुजेसाठी शेकडो कुटुंब आले होते. पुल कोसळताच शेकडो जण नदीत कोसळले. आतापर्यंतच्या माहितीनुसार १३४ हून अधिक जण ठार झाले आहेत. तर, १७७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही शेकडो जणांचा शोध सुरू आहे. कुटुंबातील सदस्याला शोधण्यात अनेक जण व्यस्त आहेत त्यातच नदी आणि रुग्णालय परिसर पूर्णपणे दुःखात बुडाला आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी मोरबीच्या शासकीय रुग्णालयात खासगी डॉक्टर आणि पॅरामेडिकची मदत घ्यावी लागली आहे. राज्याच्या इतर भागातून ३० जणांची टीम पाठवण्यात आली आहे. अहमदाबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर बांधलेला हा झुलता पूल रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता तुटला. अपघाताच्या वेळी पुलावर जवळपास ५०० जण होते आणि छठपूजेशी संबंधित विधी करत होते, असे सांगण्यात येत आहे. मच्छू नदीत अजूनही १०० लोक अडकले आहेत. सुमारे १७७ जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनडीआरएफच्या पाच पथकांना मदतकार्य सुरू केले. याशिवाय लष्कर, नौदल आणि हवाई दलानेही पुढाकार घेतला आहे. घटनास्थळी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले. सुमारे दीडशे वर्षे जुना असलेला हा केबल ब्रिज पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण होता. नूतनीकरणासाठी हा पूल ७ महिने बंद होता. गेल्या २६ ऑक्टोबर रोजी हा पूल पर्टकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. दिवाळीचा उत्सव त्यातच रविवार यामुळे खासगी हॉस्पिटलमध्येही डॉक्टरांची संख्या कमी आहे. परिणामी वैद्यकीय सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत.
#Breaking: गुजरात के मोरबी में केबल पुल टूटा, करीब 400 लोग नदी में गिरे, कई के डूबने की आशंका#Gujarat #Morbi pic.twitter.com/xMiIZFl0j5
— News24 (@news24tvchannel) October 30, 2022
Major Accident Gujrat Morbi Bridge Collapse 100 death