India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; येणार ही नवी मालिका (Video)

India Darpan by India Darpan
January 3, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झी मराठी वाहिनी ही त्यावरील दर्जेदार मालिकांसाठी ओळखली जाते. आजवर अनेक सुंदर मालिकांची भेट या वाहिनीने प्रेक्षकांना दिली. त्यामुळेच ही प्रेक्षकांसाठी आवडती वाहिनी आहे. सध्या देखील झी मराठीवर अनेक दर्जेदार मालिका सुरू आहेत. या सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातही प्रेक्षकांच्या विशेष आवडीची मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. प्रथितयश कलाकार असल्याने या मालिकेने अल्पावधीतच यशाचं शिखर गाठलं. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे असे मोठे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर परतलेला श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी प्रेक्षकांना भावली. छोटी परी तर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईतच बनली आहे. यश – नेहाच्या लग्नानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मालिका सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर या मालिकेमध्ये नेहा आणि यशचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं. मालिकेत मोठा ट्विस्ट आल्यानंतर प्रेक्षकांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’वर नाराजी व्यक्त केली. नेहा या पात्राने पुन्हा मालिकेत एण्ट्री केली असली तरी ती नेहा नसून अनुष्का आहे. आणि तिला आपल्या आयुष्यातील भूतकाळ आठवत नाहीये. त्यामुळे मालिकेच्या कथेला एक वेगळं वळण मिळालं. यावरही प्रेक्षकांनी कमेंट करत लवकरच सगळं सुरळीत होऊ दे, अशी मागणी केली होती.

यश आणि अनुष्कामध्ये अजून एक अडथळा.
‘माझी तुझी रेशीमगाठ’,
आज, संध्या. 6.30 वा.#MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi

आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxYaSG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/VIpw91ZfPw

— Zee Marathi (@zeemarathi) January 2, 2023

आता प्रार्थनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट शेअर केल्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ प्रेक्षकांचा निरोप घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. “काहीच दिवस बाकी” असं या मालिकेतील एक लूक शेअर करत प्रार्थनाने म्हटलं आहे. तर मालिका संपल्यानंतर तिचे काय प्लॅन आहेत हेही तिने सांगितलं आहे. मालिका संपल्यानंतर “सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र फक्त झोपणार” असं प्रार्थनाने म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत मालिकेतील इतर कलाकारांनाही तिने टॅग केलं आहे. दरम्यान, प्रार्थनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर “मी ही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी होणार” असं या मालिकेतील अभिनेत्री काजल काटेने म्हटलं आहे. पण खरंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

यश,परी आणि नेहाचं गोड जग. 🥰

पहा 'माझी तुझी रेशीमगाठ' सोम. ते शनि. सायं. ६:३० वा. फक्त झी मराठीवर#ZeeMarathi #MajhiTujhiReshimgath pic.twitter.com/gUcV2DmtH1

— Zee Marathi (@zeemarathi) January 3, 2023

ही नवी मालिका येणार भेटीला
झी मराठीच्यावतीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, येत्या २३ जानेवारीपासून ‘३६ गुणी जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका असणार आहे. म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या जागी ही मालिका असणार आहे. या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला नवी कोरी जोडी येणार आहे. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, “३६ गुण जुळले की जोडी जमते पण ३६ चा आकडा असणाऱ्या जोडीचं काय करायचं”, असा प्रश्न उपस्थित करीत हा प्रोमो शेअर केला आहे.

३६ गुण जुळले की जोडी जमते पण ३६चा आकडा असणाऱ्या जोडीचं काय करायचं ?

नवी मालिका '३६ गुणी जोडी'
२३ जानेवारीपासून
सोम ते शनि, संध्या. ६.३० वा. #chhattisGuniJodi #ZeeMarathi #MarathiSerial pic.twitter.com/MECcT60H0G

— Zee Marathi (@zeemarathi) December 27, 2022

Majhi Tujhi Reshimgath TV Serial Farewell Soon
Zee Marathi Entertainment Show


Previous Post

खासगी सावकाराची मनमानी! ५ टक्के व्याजाने घेतले ९ लाख…. ५० लाख देऊनही २० लाखाची मागणी… मग काय…

Next Post

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? बघा, डॉ. अमोल कोल्हे काय म्हणताय (व्हिडिओ)

Next Post

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? बघा, डॉ. अमोल कोल्हे काय म्हणताय (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group