मुंबई – देशातील अग्रगण्य उद्योग समुह असलेल्या महिंद्राने देशातील कोरोना लढ्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. समुहाने ऑक्सिजन ऑन व्हिल्स सेवा सुरू केली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात ही सेवा दिली जाणार आहे. ऑक्सिजन उत्पादक ते हॉस्पिटल आणि कोविड सेंटर अशी ही सेवा असणार आहे.
