India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नवी दिल्ली येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in राज्य
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (आयएसजीएफ) या संस्थेतर्फे २०१७ पासून ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड’ दिले जातात. वीज, पाणी, वायू आणि विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या कंपन्यांना हे पुरस्कार दिले जातात. महावितरणला ‘इमर्जिंग इनोव्हेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन’ या वर्गवारीत विजेता म्हणून पुरस्कार मिळाला.

केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, वेब पोर्टल विकसित करणे आणि मोबाईल ॲप विकसित करणे असे विविध पुढाकार महावितरणने हाती घेतले आहेत.

महावितरणने स्वतःची ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी पॉवर अप नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनधारक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधून काढू शकतो, स्वतः गाडीचे चार्जिंग करू शकतो आणि त्यासाठीचे पैसे ऑनलाईन भरू शकतो. महावितरणच्या चार्जिंग स्टेशनसोबत खासगी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती मिळण्यासाठी हे ॲप उपयोगी पडते. पॉवर अप या मोबाईल ॲप्लिकेशनमधील ‘मॅप मी’ या सुविधेच्या आधारे महावितरणच्या तसेच अन्य कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते.


Previous Post

महाराष्ट्रात या महामार्गावर जगातील सर्वात पहिले २०० मीटर लांब बांबूचे कठडे

Next Post

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेलीला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान; ग्रामपंचायतीमध्ये असा घडवला बदल

Next Post

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेलीला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान; ग्रामपंचायतीमध्ये असा घडवला बदल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group