India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तीन वर्षांचा संसार एका रात्रीत कसा मोडला? राज्यपालांची कृती लोकशाही धोक्यात आणणारी – सरन्यायाधीशांचे परखड बोल

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३४ आमदारांच्या पत्राची दखल घेताना राज्यपालांनी विचार करायला हवा होता आणि पक्षातील अंतर्गत वाद समजून दुर्लक्ष करायला हवं होतं, असे निरीक्षण नोंदवून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कोणती घटना बघून राज्यपालांनी बहूमत चाचणी बोलावली, असा सवाल केला.

सर्वोच्च न्यायालयाने थेट राज्यपालांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. ३४ आमदारांच्या पत्रात गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड हे दोनच मुद्दे होते, मग कोणत्या घटनेचा आधार घेऊन बहुमत चाचणी बोलावली, असा सवाल न्यायालयाने राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांना केला. एखाद्या पक्षातील लोक तीन वर्ष सुखाने संसार करतात आणि तीन वर्षांनंतर अचानक तुमच्याकडे येतात, तेव्हा आपण स्वतः विचार करायला हवा होता, असेही सरन्यायाधीश राज्यपालांना म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या प्रकरणातील युक्तिवाद अद्याप संपलेले नाहीत. आज राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांना युक्तिवाद करण्यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला होता. यादरम्यान सरन्यायाधिशांनी सुद्धा राज्यपाल व शिंदे गटाला काही सवाल केले.

एका रात्रीत संसार कसा मोडला?
तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल सरन्यायाधिशांनी राज्यापालांच्या व शिंदे गटाच्या वकिलांना केला आणि कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तीन वर्षे सुखाने नांदल्यानंतर एका रात्रीत कोणत्या कारणाने सरकार पडलं? तीन वर्षांत तुम्ही राज्यपालांना एकही पत्र लिहीलं नाही आणि एका आठवड्यात सहा पत्र कशी लिहीली, असेही काही सवाल न्यायालयाने शिंदे गटाला केला.

शेरोशायरीत उत्तर
राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी शेरोशायरीच्या अंदाजात सरन्यायाधिशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. ‘मै चूप रहा तो बहोत गलतफहमिया बढी, वो भी सुना उसने जो मैने कहा नही’… या शेरचा आधार घेत तुषार मेहता यांनी उत्तर दिलं.

राज्यपालांनी मौन बाळगावे का?
आमदारांना केवळ धमक्या नव्हत्या तर काही ठिकाणी हल्लेही झाले. तरीही पुढे अधिवेशन आहे म्हणून राज्यपालांनी मौन बाळगणं योग्य आहे का? असा सवाल मेहता यांनी केला. राज्यपाल फक्त बहुमत चाचणी बोलावू शकतात, इतर राजकारणाशी त्यांचा संबंध नाही, असंही तुषार मेहता म्हणाले.

म्हणून बहुमत चाचणी
अपात्रतेची कारवाई अपोआप होत नाही त्यासाठी निर्णय व्हावा लागतो. निर्णय होईपर्यंत राज्यपाल दखल घेत नाहीत. 34 आमदारांनी लिहिलेलं पत्र पाहून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावण्याचा निर्णय घेतला, असं सरन्यायाधीशांच्या प्रश्नाला उत्तर देताना मेहता यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Political Crisis Supreme Court CJI Governor


Previous Post

दुर्दैवी! एकाला वाचवायला दुसरा गेला… दुसऱ्याला तिसरा.. तिसऱ्याला चौथा.. अखेर चौघांचा मृत्यू.. बारामतीतील दुर्घटना

Next Post

सावधान! ताप अंगावर काढू नका; H3N2 वाढतोय… आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना

Next Post

सावधान! ताप अंगावर काढू नका; H3N2 वाढतोय... आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group