India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यातील २४५० मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित तर ५५२ परवाने कायमचे रद्द

बनावट औषध विक्रीवर नियंत्रणासाठी संगणक प्रणाली विकसित करणार - अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

India Darpan by India Darpan
March 21, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या काळात उत्पादक – विक्रेते – ग्राहक अशी संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज विधानपरिषदेत दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मुंबईमध्ये औषध विक्री दुकानातून खरेदी केलेल्या इंजेक्शनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तपासानंतर ते इंजेक्शन बनावट असल्याचे उघडकीस आले. त्याप्रकरणी पोलिसांत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बनावट औषध आणि गोळ्या विक्रीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी करण्यात आल्याचे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले. राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते, २८ हजार ८५५ घाऊक विक्रेते आणि ९९६ उत्पादक यांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत.

केंद्र सरकार ऑनलाईन औषध विक्री संदर्भात धोरण तयार करीत आहे. याशिवाय, परराज्यातून येणाऱ्या अशा प्रकारच्या बनावट औषध विक्री संदर्भात कडक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी, सदस्य अभिजित वंजारी, ॲड. अनिल परब, भाई जगताप, ॲड. मनीषा कायंदे आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यालाही मंत्री श्री. राठोड यांनी उत्तर दिले.

Maharashtra Medical Store License Suspend Assembly Session


Previous Post

या शहरात उभारणार ‘टेक्निकल टेक्सटाइल पार्क’ युवकांना उपलब्ध होणार रोजगार

Next Post

दुहेरी संकट! H3N2 पाठोपाठ कोरोनाची भीती; आरोग्य मंत्रालयाकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दुहेरी संकट! H3N2 पाठोपाठ कोरोनाची भीती; आरोग्य मंत्रालयाकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी

ताज्या बातम्या

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट… तब्बल १३ जणांचा मृत्यू…

September 29, 2023

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group