मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात अप्पर पोलिस महासंचालक पदावरील ३, विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरील ८ आणि उपमहानिरीक्षक पदावरील ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
– अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. ते आता नाशिक शहर पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.
– नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक पदी सुनिल फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फुलारी हे सध्या पुणे मोटार परिवहन विशेष पोलिस महानिरीक्षक आहेत.
– मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते हे आता दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील.
– बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पदोन्नती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
– रितेश कुमार हे आता पुण्याचे पोलिस आयुक्त असतील.
– विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
– वाहतूक पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली आहे. ते आता अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ असतील.
– विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.
– अमरावतीच्या आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सशस्त्र पोलिस दलामध्ये अपर पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे.
– नविनचंद्र रेड्डी हे अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त असतील.
– अमिताभ गुप्ता यांना कायदा व सुव्यवस्था, अपर पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Maharashtra IPS Officers Transfer Order