रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर करा अर्ज…

by India Darpan
जून 3, 2025 | 6:27 pm
in राज्य
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध करणाऱ्या द्राक्ष पिकासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्लास्टिक कव्हर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून द्राक्ष बागांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाकडून प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4,81,344 रुपये प्रति एकर खर्चाच्या 50 टक्के अनुदान म्हणजेच 2,40,672 रुपये प्रती एकर इतके अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू असून, क्षेत्रमर्यादा प्रति लाभार्थी 20 गुंटे ते 1 एकरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

योजनेचा उद्देश गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, उच्च दर्जाच्या व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अंग्रीस्टँक फार्मर आयडी, 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकचा पहिला पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतुःसीमा नकाशा यांचा समावेश आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयातून मिळवता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीबीआयचा छापा….अधिकाऱ्याकडून जप्त केले ३.५ किलो सोने, २ किलो चांदी आणि एक कोटी रोख

Next Post

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना या तारखेपासून ५३ टक्के महागाई भत्ता

Next Post
st bus

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना या तारखेपासून ५३ टक्के महागाई भत्ता

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011