पुणे – कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून, अनेकांना क्वचितच आपले घर सोडावेसे वाटते. त्याचबरोबर बँकांसह सर्व प्रकारच्या कामांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पेन्शनधारकांच्या सोयीसाठी एलआयसीने एक नवीन पुढाकार घेतला आहे. आता पेन्शनधारक त्यांचे आधार-आधारित डिजिटल लाइफ सर्टिफिकेट घरी बसूनच सहजपणे सबमिट करू शकतात. त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी LIC शाखेत जाण्याची गरज नाही. कारण LIC ने जीवन प्रमाणपत्रासाठी जीवन प्रमाण नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे.
पेन्शनधारक तथा सेवानिवृत्तांसाठी दरवर्षी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र तथा जिवंत असल्याचा दाखला तसेच अन्य कागदपत्रे सादर करावा लागतात, त्यानंतरच त्यांचे पेन्शन पुढे सुरू राहू शकते. त्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत प्रत्यक्ष जाऊन दाखला द्यावा लागतो. परंतु वयोमानानुसार काही ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाऊन रांगेत उभे राहणे शक्य नसते. मात्र पेन्शन धारकांना हा दाखला ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अॅप डाउनलोड करून, तुमचे आधार-आधारित डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन सहजपणे सबमिट करू शकता. हे अॅप प्रामुख्याने डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वापरले जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पॉलिसी धारकाचे आधार कार्ड त्याच्या किंवा तिच्या मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. LIC च्या अधिकृत वेबसाइटनुसार LIC जीवन प्रमाण अॅप वापरून तुम्ही काही सेकंदात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवू शकता.
याकरिता पुढील टप्पे आहेत.
टप्पा -1 जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करा.
टप्पा-2 आधार कार्ड आणि पॉलिसी तपशील ऑनलाइन प्रदान करा.
टप्पा-3 तुमचा सेल्फी घ्या.
टप्पा-4 तुम्हाला आधारशी लिंक केलेला ओटीपी सेंंट करा .
टप्पा-5 पडताळणीनंतर तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र पाहू शकता.
केंद्र सरकारने पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आपण LIC निवृत्तीवेतनधारक असाल आणि अद्याप लाइफ सर्टिफिकेट सबमिट केले नसेल, तर आता तुमच्या स्मार्ट फोनवर LIC जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करा आणि तुमचे जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकता.