लासलगाव – शहादा पोलिस स्थानकाने सराफ दुकानातून चोरी करणा-या महिलाचे व्हॉटसअपवर फोटो टाकल्यानंतर सदर फोटोच्या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी संजयनगर येथील महिला सरला कापसे (वय ३० वर्षे) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून ९० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त केले. या महिलेच्या राहत्याघरी महिला अमंलदार सोनाली शिंदे यांनी अंग झडती घेतली. त्यानंतर तिच्या ताब्यात सोन्याच्या धातुच्या पोत, मनी , मंगळसूत्र मिळून आले. सदर सोन्याच्या वस्तुबाबत तिच्याकडे विचारपुस केल्यानंतर तिने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर या महिलसे पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. येथे सखाले चौकशी केल्यानंतर या महिलेने मीना कापसे, रामदास शिंदे यांचे सोबत परिणीता ज्वेलर्स, प्रकाशा, ता शहादा जिल्हा नदुरबार येथून चोरी केली असल्याची कबुली दिली.
ही कामगिरी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोहवा कैलास महाजन, पोना संजय देशमुख, उषा आहेर पोकॉ प्रदिप आजगे, सोनाली शिंदे, माया वाघ यांच्या पथकाने केली. या चोरी प्रकरणी शहादा येथील अश्विन बाळकृष्ण सोनार यांनी फिर्याद दिली असून शहादा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास लासलगाव पोलिसांनी लावला.