इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे हा लाभ घेणा-यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आतापर्यंत या माहिलांना ३० कोटी ५८ लाख रुपये वितरतील केल्याचे बोलले जात आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, “लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे.
https://twitter.com/iAditiTatkare/status/1928433360013291830