मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकेकाळी सायकलचा पंक्चर काढणारे आता होत आहेत राज्यपाल

by India Darpan
जुलै 7, 2021 | 5:53 am
in संमिश्र वार्ता
0
E5nS3TdVkAAPWYM

नवी दिल्ली – केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीची बातमी मिळताच मध्य प्रदेशातील नागदा या गावी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. तीन वेळा आमदार, चार वेळा खासदार आणि २०१२ पासून आतापर्यंत राज्यसभेत खासदार राहिलेल्या गेहलोत यांचे सुरुवातीचे जीवन खूपच संघर्षमय होते. त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत.
मोलमजुरी ते सायकल पंक्चर काढण्याचे काम
आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला गेहलोत यांनी उपजीविका भागविण्यासाठी कारखान्यात मजुरीच्या कामासह सायकल पंक्चर काढण्याचे कामे केले आहेत. त्यानंतर सक्रियता, साधेपणा आणि सहजपणा या गुणांच्या आधारे त्यांनी राजकीय कारकीर्दीचा प्रवास केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील थावरचंद गेहलोत यांचा जन्म १८ मे १९४८ रोजी नागदाजवळील रुपेटा या गावात झाला. त्यांचे आई-वडील नागदा येथे कापड उद्योगात मजुरी करत होते. गेहलोत १८ वर्षांचे झाल्यानंतर त्यांनीही कापड उद्योगात मजुरीचे काम सुरू केले. त्यादरम्यान त्यांचे शिक्षणही सुरू होते. विक्रम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. १९७० मध्ये ते भारतीय मजूर संघात सहभागी झाले. मजुरांसाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली आहेत. आंदोलनांमध्ये सक्रिय राहिल्याने त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी सायकल पंक्चर काढण्याचे दुकान सुरू केले.

E5mP889VkA480JP

राजकीय प्रवास
१९७० च्यादरम्यान थावरचंद गेहलोत यांनी जनसंघाचे नेते मांगिलाल शर्मा यांच्या संपर्कात आले आणि आंदोलनात सहभाग घेतला. एकदा ते शर्मा यांच्यासोबत निवडणुकीचे तिकीट मागण्यासाठी कुशभाऊ ठाकरे यांच्याकडे गेले. गेहलोत यांचा स्वभाव ठाकरे यांना परिचित होता. त्यांनी गेहलोत यांना आलोट या जागेवर निवडणूक लढण्यास सांगितले. गेहलोत यांच्याकडे तेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २५०० रुपयेही नव्हते. तेव्हा ठाकरे यांनी त्यांची मदत केली. १९८० मध्ये गेहलोत पहिल्यांदाच आलोट येथून आमदार निवडून आले. आलोट मतदारसंघातून ते तिनदा आमदार म्हणून निवडून आले.
चार वेळा खासदार
थावरचंद गेहलोत १९९६-९७, १९९८-९९, १९९९-२००४ आणि २००४ ते २००९ पर्यंत देवास-शाजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडणूक जिंकले. त्यानंतर २०१२ पासून आतापर्यंत राज्यसभा सदस्य आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रात नोकरीसाठी आता हे सक्तीचे; मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची घोषणा

Next Post

मोदींचा मोठा निर्णय : या नव्या केंद्रीय मंत्रालयाची स्थापना; धुरा अमित शहांकडे

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींचा मोठा निर्णय : या नव्या केंद्रीय मंत्रालयाची स्थापना; धुरा अमित शहांकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011