पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आणि आकर्षक तसेच कार मॉडेल आणणार आहेत, त्यातच आता किआ कारेन्सच्या बुकिंगची प्रतिक्षा संपली आहे. किआ मोर्टर्स इंडियाने सांगितले की, कारेन्स MPV साठी बुकिंग आजपासून (14 जानेवारी) पासून सुरू झाले आहे. अवघे २५ हजार रुपये भरुन या कारचे बुकंग करता येणार आहे. किआ कारेन्सची स्पर्धा Hyundai Alcazar, Maruti Suzuki XL6, Tata Safari, Toyota Innova Crysta आणि Mahindra Marazzo यांच्याशी होईल.
सर्वप्रथम भारतीय बाजारात
किआ कारेन्स ही सेल्टोस, कार्निव्हल आणि सॉनेट नंतर भारतातील दक्षिण कोरियाच्या ब्रँडची चौथी प्रवासी कार असेल. या कंपनीने सेल्टोस आणि सॉनेट सारख्या मॉडेलमुळे लक्षणीय यश मिळवले आहे. किआ केरेन्स MPV द्वारे देखील मिळवेल, अशी अपेक्षा आहे. Kia Carens MPV ची निर्मिती आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ऑटोमेकर प्लांटमध्ये तयार होऊन भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. जगातील इतर कोणत्याही बाजारपेठेपूर्वी ही एमपीव्ही कार मिळवणारा भारत हा पहिला देश असेल.
Fasten your seatbelt for an exceptional space-age experience that belongs to a different world.
Get ready to meet the all-new Kia Carens, booking starts 14th Jan’22. #KiaCarens #TheNextFromKia #FromADifferentWorld#MovementThatInspires
— Kia India (@KiaInd) December 30, 2021
कारची वैशिष्ट्ये
किआ कारेन्स (Kia Carens ) कारला LED डे टाईम रनिंग लाइट्स, मोठे एलईडी हेडलॅम्प्स, स्लीक ह्युमनिटी लाइन, डायमंड-आकाराची जाळी असलेली एक मोठी फ्रंट लोखंडी जाळी आणि उभ्या स्लँटेड LED फॉग लॅम्पसह स्लीक क्रोम लाइनिंग मिळते. Kia Carens ला स्पोर्टी अलॉय व्हील्स, क्रोम गार्निश केलेले डोअर हँडल, टर्न इंडिकेटर इंटिग्रेटेड विंग मिरर, साइड सिल्स आणि ब्लॅक क्लॅडिंग, डेल्टा-आकाराचे रॅपराउंड एलईडी टेललाइट्स विस्तीर्ण रिफ्लेक्टर, ब्लॅक क्लॅडिंगसह चंकी बंपर, क्रोम ट्रिम आणि टेल गेट तयार केलेले आहे.
सुविधा व सुरक्षा
कारमधील केबिनच्या आत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-टोन कलर थीम, लेदर सीट आणि अनेक स्टायलिश आणि प्रीमियम फीचर्स मिळतात. Kia Carens MPV मध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, ESC, HAC, VSM, DBC, BAS, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, TPMS आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ही MPV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. Kia Carens ला सात-स्पीड DCT ऑटोमॅटिक गीअरबॉक्स पॅडल शिफ्टर्ससह टर्बो पेट्रोल इंजिन आणि सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात येईल.