India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे वेळेवर मिळेल का? सरकारचे असे आहे नियोजन

India Darpan by India Darpan
April 29, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभाग, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठाच्या बरोबर बीज उत्पादक कंपन्यांनी सुध्दा प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

खरीप हंगाम 2023 मध्ये कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते. या बैठकीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, डॉ. प्रकाश कडू, केंद्रीय कापूस संशोधन संस्थचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ आणि कापूस बिग उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योग्य नियोजनाने बोंड अळीचा प्रादूर्भाव कमी होऊन शेतकऱ्यांना कपाशीचे भरघोस उत्पादन घेता येईल. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे. नियोजनाप्रमाणे योग्य अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा, कृषीमंत्र्यानी केली.

निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविकात महाराष्ट्रातील कापूस पिकाखाली खरीप हंगाम 2023 मध्ये अंदाजे 43 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल. त्यामध्ये 98 टक्के क्षेत्र हे बी. टी. कापसाचे असेल आणि यासाठी लागणाऱ्या 1 कोटी 81 लाख पाकीटाचे नियोजन झाले असून पुरवठा उत्पादक से वितरक 10 मे 2023 पर्यंत, वितरक ते किरकोळ विक्रेता 15 मे पर्यंत आणि किरकोळ विक्रेता ते शेतकरी जून पासून वितरण होईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ. मिलींद राठोड यांनी केले आणि आभार अधीक्षक कृषि अधिकारी मिलींद शेंडे यांनी मानले.

Kharip Season Cotton Seeds Government Planning


Previous Post

बोर्डाचा निकाल जाहीर होताच तब्बल ९ शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या; शिक्षण क्षेत्र हादरले

Next Post

शेतमाल तारण कर्ज योजना… शेतकऱ्यांना ठरतेय वरदान… जाणून घ्या याविषयी सविस्तर

Next Post

शेतमाल तारण कर्ज योजना... शेतकऱ्यांना ठरतेय वरदान... जाणून घ्या याविषयी सविस्तर

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group