India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रत्येकाकडून १०० रुपये… दररोज ४ हजार भाविक येतात… कोण आहे करौली बाबा? अवघ्या ३ वर्षात कसे निर्माण झाले कोट्यवधीचे साम्राज्य?

India Darpan by India Darpan
March 23, 2023
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कधी काही शेतकरी आंदोलनात नेता राहीलेली व्यक्ती आता बाबा बनून हजारोंना अध्यात्माचा मार्ग दाखवित असल्याचा फुल्ल टू फिल्मी प्रकार उत्तरप्रदेशात घडला आहे. शेतकरी नेता, अनेक गुन्हे दाखल असलेल्या या महाराजांचे नाव करौली बाबा असे आहे.

करौली बाबा यांचे मूळ नाव संतोष सिंह भदौरिया असून ते उन्नावच्या बारह सगवर येथील आहेत. उत्तर प्रदेशसह देशात महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन गाजत होते. त्यावेळी किसान युनियन नेते संतराम सिंह यांची हत्या झाली. तेव्हा संतोष सिंह भदौरिया यांना टिकैत यांनी सरसोल परिसराची जबाबदारी दिली होती. ते शेतकरी आंदोलनात पोलिसांसोबतही भिडले होते.

संतोष सिंह भदोरिया उर्फ करौली बाबा जेव्हा कोळसा महामंडळाचे अध्यक्ष बनले त्यावेळी ते प्रसिद्धीझोतात आले. मात्र, ही प्रसिद्धी काही दिवसांसाठीच टिकलं. करौली बाबांवर अनेक गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत. १९९२-९५ दरम्यान त्यांच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच करौली बाबा यांच्यावर एका भक्ताने मारहाणीचा आरोप केला असून त्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने बाबा पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.

तीन वर्षांत कोट्यवधींचे साम्राज्य
बाबांनी करौली आश्रम बांधला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शनि मंदिर बांधले. त्यानंतर त्यांनी आणखी काही जमीन खरेदी करून करौली आश्रम सुरू केला. या आश्रमात आयुर्वेदिक रुग्णालय, कामाख्या मातेचे मंदिर बांधण्यात आले. बाबांनी यूट्युबच्या माध्यमातून आपल्या तंत्र-मंत्राचा प्रचार सुरू केला. त्यांनी तीन वर्षांत कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. त्यांचा आश्रम १४ एकरांवर पसरलेला आहे.

दररोज ३ ते ४ हजार लोक आश्रमात पोहोचतात. येथे येणाऱ्या भाविकांना प्रथम १०० रुपयांची पावती फाडावी लागते. त्यानंतर तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. करौली बाबा होम करण्याचा मंत्र देतात. या हवनाचा खर्च ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे.

Karoli Baba Santosh Singh Bhadoriya Life journey


Previous Post

‘आनंदाचा शिधा’ नक्की कधीपर्यंत मिळणार?

Next Post

शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्यासाठी असा आहे हवामानाचा अंदाज

Next Post

शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्यासाठी असा आहे हवामानाचा अंदाज

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group