नाशिक – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यासाठी २७ मे रोजी भोजनाच्या सुट्टीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १.३० ते २.३० दरम्यान निदर्शने केली जाणार आहे. या आंदोलनाविषयाची माहिती अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे यांनी दिली. या आंदोलनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करा, सर्व विभागातील रिक्त पदे कायमस्वरुपी भरा, समान कामास समान वेतन या न्यायानुसार कंत्राटी व रोजंदार कर्मचा-यांच्या सेवा त्वरीत नियमीत करा, फायद्यातील सरकारी उद्योगांचे खासगीकरण करु नका, वीज मंडळा, सार्वजनिक बँक, जीवन बीमा योजना यांचे खासगीकरण थांबवा, जातीयवाद थांबवून धर्म निरपेक्षता कायम राखा, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करुन महागाईला आळा घाला, नवीन शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करा, कामगार कायद्यातील घातक सुधारणा रद्द करा, घटनेतील कलम ३१० व ३११(२) (ए) (बी) (सी) रद्द करा, आयकर आकारणीसाठी उत्पन्न मर्यादा वाढवा, महागाई भत्ता गोठवू नका, या मागण्या आहे.
अखिल भारतीय राज्य सराकरी कर्माचारी महासंघाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन बेगुलसराय बिहार येथे १३ ते २६ एप्रिलला संपन्न झाले. या अधिवेशनात २७ राज्यातील प्रतिनिधी उपस्थितीत होते. या अधिवेशनाच देशभरात अखिल भारतीय मागणी दिन पाळण्याचे निश्चित झाल्याचेही माहिती अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे यांनी दिली.