सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कांदा प्रश्नावर सटाणा येथे महाविकास आघाडी तर्फे सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती समोर रास्त्यावर कांदा ओतत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांद्याला १५०० रुपये हमीभाव मिळावा. कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा, कांद्याला ५०० रुपये अनुदान मिळावे, निर्यात खुली करावी या मागण्यांकडे केंद्र सरकार व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.