कळवण – कळवण लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष दादासाहेब मधुकर जगन्नाथ मालपुरे यांचे आज निधन झाले. कुलस्वामिनी जोगेश्वरी ते देवीचे निस्सीम भक्त होते. विविध संस्थांवर त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. दानशूर व परोपकारी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (१५ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता गिरणा संगम, कळवण येथे अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान शाहीर लेन, श्रीराम मंदिराच्या पाठीमागे येथून निघेल. त्यांच्या पश्चात संजय, अजय आणि राजेश ही तीन मुले आहेत.