India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘कच्चा बादाम’च्या गायकाची अशी आहे दयनीय अवस्था

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिला जाणारा प्रकार म्हणजे रिल्स. दिवसाला मोठ्या प्रमाणात रिल आपापल्या अकाऊंटवर टाकणारे महाभाग कमी नाहीत. या रिल्सचा मोह सेलिब्रिटींना पडला नाही तरच नवल. काही काळापूर्वी सोशल मीडियावर सर्वाधिक गाजलेले रिल म्हणजे ‘कच्चा बदाम’. मात्र, हे गाणं लोकप्रिय करणारे मूळ गायक सध्या काय करतात, माहीत आहे का तुम्हाला?

कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांना त्यांचेच स्वतःचे हे गाणे गाताना अडचण येते आहे. त्यांची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. ज्या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली, तेच गाणं गाण्यात त्यांना अडचण येत आहे. भुबन यांनी त्यांच्याबरोबर फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. भुबन बड्याकार यांच्या गाण्याचा कॉपीराइट दुसऱ्याने घेतला आहे. त्यामुळे त्यांना ते गाणं गाता येत नाही. सोशल मीडियावर ते गाणं पोस्ट केल्यावर मूळ गायकाला म्हणजेच भुबन यांना कॉपीराइट पाठवला जात आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गाणं गाता येत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झालं आहे, तसेच त्यांना कुठेच शो करता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, गोपाल नावाच्या व्यक्तीने त्यांना ३ लाख रुपये देत हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी त्यांना हे पैसे दिले होते. पण आता भुबन जेव्हाही हे गाणं गातात आणि पोस्ट करतात, तेव्हा कॉपीराइटचा मुद्दा येतो आहे. आपल्या गाण्याचे सगळे हक्क त्या व्यक्तीने विकत घेतल्याचं भूबन सांगतात. ‘त्या व्यक्तीने पैसे देताना काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या होत्या. मी अशिक्षित आहे. मला हे सर्व समजत नाही आणि यामुळे माझा गैरफायदा घेतला गेला आहे, असं भुबन म्हणाले.

प्रसिद्धी मिळाल्यानंतर भुबन यांनी गावात घर बांधण्याचा विचार केला होता, पण आता परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. कॉपीराइटमुळे गाता येत नाही, परिणामी कामही मिळत नाही. “सध्या काम मिळत नाही. छोटं-मोठं काम करून महिन्याला काही हजार रुपये कमावतो. त्यातूनच उतरनिर्वाह करतोय. हे अजून किती दिवस चालेल माहीत नाही,” हे सांगतानाच भुबन यांना भरून आलं आणि ते रडू लागले.

Kacha Badam Singer Bhuban Very Bad Situation


Previous Post

मृतदेहाच्या शर्टच्या खिशातील तिकीटावरुन धुळे पोलिसांनी शोधले हत्यारे; पत्नीनेच संपवले स्वत:च्या पतीला

Next Post

चॅटजीपीटी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते का? बघा, निकाल काय लागला

Next Post

चॅटजीपीटी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते का? बघा, निकाल काय लागला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group