इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिंदे तात्या आणि उचके टेलर
(शिंदे तात्या कपडे शिवण्यासाठी उचके टेलरकडे जातात तेव्हा)
शिंदे तात्या – का हो, तुमच्याकडे ड्रेसचा कपडा घेऊन आलो
तर तुम्ही म्हणालात की,
कापड कमी आहे. आणखी लागेल.
म्हणून मी झंप्या टेलरकडे गेलो.
त्याने तर मला ड्रेस शिवून दिला.
शिवाय त्याच्या मुलाचाही ड्रेस त्यात शिवला.
हे कसं काय?
उचके टेलर – अहो तात्या. अगदी बरोबर आहे.
झंप्याचा मुलगा ५ वर्षांचा आहे.
आणि माझा मुलगा १५ वर्षांचा आहे ना म्हणून…
– हसमुख