इंडिया दर्पण – हास्य षटकार – मोनू आणि त्याचे वडील मुलगी पहायला जातात तेव्हा
मोनूच्या लग्नासाठी मुली बघण्याचे सुरू असते.
एक चांगले स्थळ येते.
मुलगी नोकरीला असते.
हे स्थळ हातचे जाऊ नये, असे मोनूच्या वडिलांना वाटते.
म्हणूनच ते मुलगी बघायला जाण्यापूर्वी मोनूला सांगतात.
मुलीच्या घरी गेल्यावर तिथे तिकडच्या लोकांसमोर
मोठमोठ्या गोष्टी बोल!! त्यामुळे आपले इम्प्रेशन पडेल!!
दोघेही मुलीच्या घरी पोहचतात.
मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
मुलगी हॉलमध्ये येते आणि मोनूच्या समोरच्या खुर्चीवर बसते.
त्याचवेळी मोनू वडिलांना म्हणतो,
बाबा, चावी द्या ना, ट्रेन उन्हात उभी आहे,
तिला सावलीत लावून येतो….!!
– हसमुख