इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा उशीराने येतो तेव्हा
सुधीर रात्री उशीराने घरी येतो.
दररोज तो ऑफिस सुटल्यावर साधारण ७ वाजता घरी येतो.
पण त्याला खुप उशीर झाल्याने त्याची बायको खुप रागावलेली असते.
सीमा (रागाने): एवढा उशीर का झाला?
मी किती वेळ झाली वाट बघतेय…
तुम्ही फोनही केला नाही
सुधीर : बॉसने थांबवले होते,
अखेर त्याच्यासोबत डिनर केले..!
सीमा (उत्सुकतेने) : बरं जाऊ द्या… काय खाल्ले?
सुधीर (अतिशय शांतपणे) : शिव्या…!!
– हसमुख