इंडिया दर्पण – हास्य षटकार – पाहुणे आणि आगलावे यांच्यातील संवाद
(मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो)
पाहुणे – आगलावे, तुमची मुलगी
अन्नपूर्णा आहे ना.
म्हणजे तिला
स्वयंपाक येतो ना….
श्री. आगलावे – नाही हो,
तिला अजून
स्वयंपाक नीट
जमत नाही.
पण, शिकेल ती
हळूहळू….
सौ. आगलावे – अहो, स्वयंपाक नाही
करता आला म्हणून
काय झालं…..
तिला ऑनलाईन
ऑर्डर तर देता येते.
ती सर्व काही
मागवेल.
चिंता करु नका
– हसमुख