मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिंदालच्या अडचणी वाढल्या…शेअर्स गडगडले; एनसीएलटीकडे क्लास ॲक्शन खटला दाखल

by Gautam Sancheti
मे 23, 2025 | 7:18 am
in संमिश्र वार्ता
0
stock market

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड या कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. कंपनीला लागलेली आग धुमसत असतानाच आणखी दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत घसरले असून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) कडे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेडचा मुंबई-आग्रा हायवेलगत घोटी जवळ कारखाना आहे. कंपनीच्या प्लांटमध्ये अचानक आग लागली. अनेक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याने भीतीचे वातावरण तयार झाले. हे सारे घडत असतानाच मुंबई शेअर बाजारातही त्याचे पडसाद पहायला मिळाले. जिंदालचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत घसरले. २,८४८.०९ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेडचे शेअर्स प्रति शेअर ६५०.४५ रुपयांवर व्यवहार करत होते. जे मागील बंद किंमती ६९५.८५ रुपयांच्या तुलनेत सुमारे ६.५२ टक्क्यांनी कमी होते. आगीमुळे कंपनीची उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरीकडे पाहता, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या महसूलात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीची उलाढाल ९८३.७६ कोटी रुपयांवरुन १,३७१.२० कोटी रुपयांवर पोहोचला.

निधीच्या उधळपट्टीचा आरोप
जिंदाल पॉली फिल्म्सच्या भागधारकांनी एनसीएलटीकडे धाव घेतली आहे. भागधारकांनी कंपनी विरोधात क्लास अॅक्शन खटला ९ एप्रिल रोजी दाखल केला आहे. प्रवर्तकांनी निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप याद्वारे करण्यात आला आहे. एनसीएलटीकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कथित गैरवर्तनामुळे कंपनीला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिंदाल पॉली फिल्म्सने आर्थिक वर्ष २०१३ ते आर्थिक वर्ष २०१७ दरम्यान जिंदाल इंडिया पॉवरटेक लिमिटेड आणि जिंदाल इंडिया थर्मल पॉवर लिमिटेड या दोन संबंधित कंपन्यांमध्ये ऑप्शनली कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स (ओसीपीएस) आणि रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स (आरपीएस) सारख्या आर्थिक साधनांचा वापर करून ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कामकाजाचा ताण कमी करावा, जाणून घ्या, शुक्रवार, २३ मेचे राशिभविष्य

Next Post

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’…महसूलमंत्री यांनी दिले हे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एसओपी ची अंमलबजावणी करावी 2 1024x534 1

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’…महसूलमंत्री यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
445

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीबाबत झाला हा मोठा निर्णय…

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, मंगळवार, ८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011