इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील घनकुल गली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबी टायरमध्ये हवा भरताना अचानक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही टायरमध्ये हवा भरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
सिलतारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायरमध्ये जास्त हवा भरल्याने त्याचा स्फोट झाला. टायर फुटताच दोघे मजूर वेगाने हवेत उडाले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. राजपाल सिंग आणि प्रंजन नामदेव अशी मृतांची नावे असून दोघेही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी आहेत.
उन्हाळ्यात टायरमध्ये तीन ते पाच युनिट हवा निर्धारित पीएसआयपेक्षा कमी ठेवावी, असा सल्ला टायर तज्ज्ञ देतात. विशेषतः जर तुम्ही लांबच्या मार्गावर जात असाल तर टायरमध्ये हवा थोडी कमी असावी. उन्हाळ्यात, टायरचे कण एकमेकांवर आदळतात आणि पाच युनिट्सपर्यंत जास्त दाब निर्माण करतात. अशा परिस्थितीत, जर वाहनातील प्रेशर आधीच भरलेले असेल, तर गाडी चालवताना तुमचा टायर कधीही फुटू शकतो.
वाहन तज्ज्ञांच्या मते, कारमधील हवेचा दाब 32 psi पेक्षा जास्त नसावा. जर उष्णतेमध्ये कार चालवत असाल तर टायरमधील हवेचा दाब 28 ते 30 psi च्या दरम्यान ठेवा. उन्हाळ्यात आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कार चालवत असताना, पुढचे टायर मागील टायरपेक्षा जास्त झिजतात. अशा परिस्थितीत, जर पुढचे टायर कमकुवत किंवा खराब झाले असतील आणि मागील टायर चांगल्या स्थितीत असतील, तर पुढचा टायर मागे घ्यावा. आणि मागचा टायर पुढे बसवावा.
टायर में हवा भरा जा रहा है।
एक व्यक्ति टायर के ऊपर बैठा है।
दूसरा पास में आकर टायर को दबा कर हवा चेक कर रहा है।
अचानक टायर फटा और दोनों की मौत हो गई।
ये हादसा रायपुर में हुआ है। pic.twitter.com/9DAeGb8YLR— Gyanendra Tiwari (Vistaar News) (@gyanendrat1) May 5, 2022