नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवरुन गेले काही दिवस वाद सुरु असतांना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विट करुन सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? पाटील यांच्या या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी या ट्विटवरुन आज हिवाळी अधिवेशनात हे ट्विट कोणी केले, त्यामागे कोणाता पक्ष आहे हे कळलंय असे सांगितले होते. त्यानंतर पाटील यांनी हा निशाणा साधला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ? https://t.co/bmTMkjTOkv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 19, 2022
Jayant Patil Appeal to Elon Musk Tweet Viral