इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवर राईडचा थरार
अशी झाली बर्फाच्छादित काश्मीरमध्ये एण्ट्री
आयुष्यात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये एण्ट्री… ती सुद्धा आर्मी जवानांच्या ताफ्यासोबत… सगळीकडे बर्फ… उंच डोंगररांगा… दहशतवादी कारवायांमुळे ख्यात असलेल्या काश्मीरमध्ये काय दिसेल, कसे असेल, अशा उत्सुकता आणि भीतीपोटी आम्ही काश्मीरात दाखल झालो. अनपेक्षित आणि स्वप्नवत वाटावे असेच सारे काही घडत होते…

इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
दि १३.०९.२०२२… सकाळी ५.३० ला सर्व राईडर्स उठले. पटापट आंघोळ, चहा आणि नाष्टा करुन सर्वांनी गाडीवर लगेज बांधले. सकाळी ६.३० ला लाईन अप करून बाईक मध्ये पेट्रोल भरण्यासाठी सज्ज झालो. आमच्यातील निम्म्याहून अधिक लोकांची काश्मीरला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. मला तर प्रचंड टेन्शन आलं होतं. पण सोबत असलेले सहकारी आणि आर्मीचे जवान माझा आत्मविश्वास वाढवत होते. आज ही जम्मू ते श्रीनगर २५० किलोमीटरवर ठिकठिकाणी मिलिटरीचा प्रचंड ताफा उभा होता. आणि वाटेत ठिकठिकाणी sports authority चें सदस्य आमच्यासाठी पाणी, सफरचंद तसेच ड्रायफुट घेऊन उभे होते. हाय अल्टीट्यूडमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा पाणी सतत प्यायला हवे. AMS म्हणजे Anti Mountain sickness होऊ नये ह्यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तशी काळजी आम्ही घेत होतो.
आता आम्ही lunch point रामबाण येथे पोहचलो. जेवण वगैरे आटोपल्या वर पुढे निघालो. दोन पोलिसांच्या एस्कॉर्ट कार आणि बाईकर्सच्या शेवटी अॅम्ब्युलंस असा ताफा पुढे सरकत होता. संध्याकाळी 6 वाजता आम्ही काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे पोहचलो.
आजही आमचा मुक्काम आर्मी सोबत कॅन्ट मध्ये होता. श्रीनगर 256 Transit camp मध्ये सुरक्षित पोहचल्यावर आम्ही जल्लोष केला. कारण सुरक्षेच्या बाबतीत चिंता सगळ्यांनाच होती. लेडीज रायडर्ससाठी आजही ५ सेपरेट गेस्ट हाऊस होते. आणि पुरुषांना स्वतंत्र जेवणाची आणि झोपण्याची सोय होती.
दुसऱ्या दिवशी श्रीनगर ते कारगील २०५ किलोमीटर प्रवास सुरु झाला. रस्ता सुंदर आणि मोकळा होता NH-1 वरचा सुंदरप्रवास अविस्मरणीय. आता आमची भेट कारगील वॉर मेमो रियलमध्ये होती. भारत-पाकिस्तान चे १९७० साली झालेल्या युद्धाबद्दल तिथे आम्हाला माहिती देण्यात आली. तेथे शहीद विक्रम बत्रा व त्यांच्या टीमचे वर्णन करण्यात आले. खरोखर तिथल्या शहीद जवानांच्या स्मृती स्थळाला बघून सगळ्यांचेच डोळे पाणावले. कारण आज जो आझादीचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, तो त्यांनी त्यांच्या जिवाची पर्वा न करता प्राणांची आहुती दिली म्हणून……..
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
Jammu and Kashmir Entry Bullet Bike Ride by Deepika Dusane