India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तळपतं ऊन… घराघरात कुलरचा वापर.. चिमुरडीच्या वाढदिवशीच घडली अतिशय हृदयद्रावक घटना… खान्देशात सर्वत्र हळहळ

India Darpan by India Darpan
May 21, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाचा पारा कधी ४५ तर कधी ४६ पर्यंत जात आहे. उकाडा आणि घामट्याने सर्वच खान्देशवासिय हैराण झाले आहेत. अशाच या कठीण वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून एका चिमुरडीचा अंत झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडली आहे. वैष्णवी चेतन सनान्से (वय ९ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. सनान्से कुटुंबिय हे प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगर मध्ये राहतात. वैष्णवीचा नववा वाढदिवस असल्याने घरात अतिशय चैतन्याचे वातावरण होते. सायंकाळी हा वाढदिवस जंगी साजरे करण्याचेही नियोजन होते. खासकरुन वैष्णवी तर अतिशय उत्साहात होती. वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं, कोणता केक आणायचा हे सारंच ती मनामध्ये ठरवत होती. वाढदिवसाबाबत घरात चर्चा आणि तयारी सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

जशी जशी सायंकाळ झाली तशी वैष्णवीची घालमेल आणखीनच वाढली. आता थोड्याच वेळात वाढदिवस साजरा होणार म्हणून ती प्रचंड उत्साहात होती. सायंकाळचे साडेसहा वाजले होते. त्याचवेळी वैष्णवी कुलर जवळ काही निमित्ताने गेली. आणि अतिशय हृदयद्रावक घटना घडली. वैष्णवीला कुलरचा जबरदस्त शॉक बसला. त्यामुळे वैष्णवी जागीच कोसळली. घरच्यांनी हे पाहिले आणि त्यांनाही काय करावे सूचत नव्हते. तेवढ्यात वैष्णवीला उचलून डॉक्टरकडे नेण्यात आले. पण, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून सनान्से कुटुंबावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी ही गोपाळ बळिराम सनान्से (रा. चिचोंल, ह. मु. मुक्ताईनगर) यांची नात होती. वाढदिवसाच्या दिवशीच काळाने तिचा घात केला. शोकाकुल वातावरणातच वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवी ही ओम साई सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज (अंत्यविधी, भजनी मंडळ) याची कन्या होती.

Jalgaon Muktai Nagar Girl Child Death Cooler Shock


Previous Post

नाशिकरोडचा अट्टल गुन्हेगार घोड्या तोरवणेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; केली ही मोठी कारवाई

Next Post

पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

Next Post

पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group