India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तुमच्या बाळाला प्लास्टिक सर्जरीची गरज आहे? मग, या मोफत शिबीराचा नक्की लाभ घ्या

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “२९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर” दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थपाक श्री. शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. हस्तीमलजी मुनोत यांनी कळविले आहे.

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन २,८८००० पेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या आता मागील ११ वर्षापासून यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ.लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन यांनी गेल्या ११ वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ च्या शिबिरामध्ये अंदाजे २०० ते ३०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रमुख श्री शशिकांत मुनोत यांनी कळविले आहे. कोविड प्रोटोकॉल मुळे यावर्षी चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त गुरुवारी दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते २.०० पर्यंत होणार असून दिनांक ६-७-८ जानेवारी रोजी निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्री विजय पारख (98224 24316) व श्री राजेंद्र सुराणा (93710 23161) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Jain Organization Free Plastic Surgery Camp


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – याखेरीज दुसरा कोणताही समाधानकारक मार्ग नाही

Next Post

नाशिक जिल्हा आहे जगाचे किचन… बघा, जगभरात काय काय होतेय निर्यात… आता फक्त याचीच आहे गरज…

Next Post

नाशिक जिल्हा आहे जगाचे किचन... बघा, जगभरात काय काय होतेय निर्यात... आता फक्त याचीच आहे गरज...

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group