सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत ‘जागर संविधानाचा’

by India Darpan
एप्रिल 21, 2025 | 3:30 pm
in संमिश्र वार्ता
0
Go iS JaUAEJPVm 1024x683 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा हा सांगीतिक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा हा सोहळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेली मूल्ये, तत्वे आणि त्यांचे विचार जगाला मार्गदर्शक असून त्यांची ही मूल्ये व विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्यात येणार असून अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात सुध्दा चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असा संस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार संजय उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, राज पुरोहित, मुख्यमंत्री कार्यालयाचे व संस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह सिने, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले, संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करून संविधानाचा जागर करण्यात येत आहे. राज्यात या निमित्ताने चर्चासत्रे, उद्देशिकेचे वाचन, घरोघरी संविधान यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधान जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी मांडण्याचा सांस्कृतिक विभागाचा संकल्प आहे.

अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रम होत आहे. नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री श्री. शेलार म्हणाले.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट या कारणांनी ठरली महत्त्वाची…

Next Post

सन्माननीय राजसाहेब जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल, पण…महायुतीच्या मंत्र्यांचा सल्ला

Next Post
Untitled 25

सन्माननीय राजसाहेब जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल, पण…महायुतीच्या मंत्र्यांचा सल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011