India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केंद्र सरकारचा मोठा अधिकारी CBIच्या गळाला; पथकाला सापडली एवढी मालमत्ता

India Darpan by India Darpan
October 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ईडीने गुजरात केडरचे आयएएस अधिकारी के. राजेश यांच्या विरोधात अहमदाबादच्या न्यायालयात पुरवणी तक्रार दाखल केली आहे. या अधिकाऱ्यासोबत भ्रष्टाचारासाठी मध्यस्थ म्हणून काम केलेल्या रफीम मेननचीही आता चौकशी होणार असून, न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे.

के. राजेश २०११च्या बॅचचा गुजरात केडरचा आयएएस अधिकारी आहे. जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना २७१ लोकांना बंदुकीचा परवाना जारी केला होता. परवाने जारी करताना त्याने रफीकच्या माध्यमातून पैसे गोळा केले होते. या परवान्यांपैकी काही परवान्यांसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नकारात्मक अहवाल दिला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत राजेशने परवाना जारी केला होता. जानेवारी २०२१ मध्ये एका व्यावसायिकाला बंदुकीचा परवाना देतेवेळी राजेशने पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी व्यापाऱ्याने गुजरात पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला होता. त्यावेळी राजेशने जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीत अनेकांकडून परवान्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर राजेशची बदली करण्यात आली होती. मात्र, तपास पुढे गेला त्यावेळी त्याने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे पुढे आले व १३ जुलै रोजी सीबीआयने त्याला अटक केली.

याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये मोरादाबाद येथे आयकर विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या अमित निगम या अधिकाऱ्याने अवैधरीत्या संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता त्याच्या तसेच त्याच्या पत्नीच्या नावे असल्याचेही दिसून आले. या अधिकाऱ्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचेही आढळले. यात दिल्लीमध्ये फ्लॅट, लखनौचा फ्लॅट, भूखंड व लखनौ येथे ३ मजली इमारत यांचा समावेश आहे. यांची किंमत ८ कोटी १ लाख ६४ हजार रुपये आहे. या अधिकाऱ्याने बँकेकडून मोठ्या कर्जाची उचल आणि परतफेडही केली. उत्पन्न आणि मालमत्ता यासंदर्भात सुसूत्र माहिती न देता आल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली.

मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास
या प्रकरणाची आर्थिक व्याप्ती मोठी असल्यामुळे आणि यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने ६ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली होती. यानंतर त्याच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी करत त्याची एक कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली. सध्या राजेश न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी तक्रारीनंतर त्याची आणखी चौकशी केली जाणार आहे. तसेच, ८६ टक्के अधिक मालमत्ता जमा करणाऱ्या आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. त्याच्याकडे ७ कोटी ५२ लाखांची मालमत्ता आढळली. विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमाविलेल्या पैशातून अधिकाऱ्याने तीन मजली इमारत बांधल्याचा ठपकादेखील सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे.

IRS Officer CBI Raid Bribe Corruption Property
Unaccounted Wealth


Previous Post

दिवाळीपूर्वी या ४ राशींची लागणार लॉटरी! काय होणार लाभ? घ्या जाणून सविस्तर

Next Post

पक्षांतराबाबत केरळ हायकोर्टाने दिला हा महत्त्वाचा निकाल

Next Post

पक्षांतराबाबत केरळ हायकोर्टाने दिला हा महत्त्वाचा निकाल

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group