India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवित… प्लेऑफमध्ये जाणार की नाही…. सारे यावरच अवलंबून

India Darpan by India Darpan
May 21, 2023
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गुणतालिकेत ते पहिल्या चारमध्ये परतले आहेत. मुंबईचे १४ सामन्यांत १६ गुण आहेत. सनरायझर्सवरच्या विजयाने राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाहेर फेकले आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दबाव वाढला आहे.

मुंबईचा संघ राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता आरसीबीकडे गुजरातविरुद्ध विजयाशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचे १४ सामन्यांतून केवळ १४ गुण आहेत. सनरायझर्सविरुद्ध मुंबई हरेल, अशी ती प्रार्थना करत होती. असे झाले असते तर राजस्थानच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. त्यांचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला होता. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई तसेच आरसीबीचा पराभव आवश्यक होता, पण मुंबईच्या विजयाने त्यांच्या आशा आधीच संपुष्टात आल्या होत्या.

𝙂𝙡𝙤𝙧𝙞𝙤𝙪𝙨 𝙂𝙧𝙚𝙚𝙣!

How good was that knock in the chase 🙌

Relive that 💯 moment here 🔽 #TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/ZugNklUFKI

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023

आरसीबीसमोर हे आहेत पर्याय
– गुजरातविरुद्धचा सामना हरला किंवा रद्द झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही.
– जर RCB संघ हा सामना हरला तर त्याचे १४ सामन्यांमध्ये फक्त १४ गुण राहतील.
– गुजरातविरुद्धचा सामना रद्द झाल्यास त्याला एक गुण मिळेल आणि त्याला १४ सामन्यांत केवळ १५ गुण मिळू शकतील.
– जर आरसीबीच्या संघाने गुजरातला हरवले तर त्याचे १४ सामन्यांत १६ गुण होतील.
– आरसीबीचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत, जर आरसीबी संघ जिंकला तर चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पोहोचेल.
– आरसीबीच्या विजयानंतर मुंबईचा संघ पाचव्या स्थानावर घसरेल.

𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗖𝗛𝗔𝗦𝗘!@mipaltan stay alive in #TATAIPL 2023 courtesy of an exceptional batting display and an 8-wicket win over #SRH 👏🏻👏🏻#MIvSRH pic.twitter.com/t1qXyVbkqG

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023

दरम्यान,  मुंबई आणि सनरायझर्स या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने पाच गडी गमावून २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २ गडी गमावून २०१ धावा केल्या आणि १८ षटकांत सामना जिंकला. हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ८३ धावा केल्या. विव्रत शर्मानेही ६९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहितनेही ५६ धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली. त्याचवेळी हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

𝕄𝕀 – 𝟭𝟲

All 👀 on Bengaluru now#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/SmxF7izwhP

— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2023

IPL Mumbai Indians Play Off Scenario Chances


Previous Post

पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी चक्क पाया पडून केले नरेंद्र मोदी यांचे स्वागत… ही परंपराही बदलली…

Next Post

कसं असेल नवं शैक्षणिक धोरण? कुठले मोठे बदल होतील? घ्या जाणून सविस्तर

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

कसं असेल नवं शैक्षणिक धोरण? कुठले मोठे बदल होतील? घ्या जाणून सविस्तर

ताज्या बातम्या

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group