अहमदाबाद (गुजरात) – जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या प्रत्येक कामाची जोरदार चर्चा होत असते. म्हणतात ना श्रीमंतांचे थाटच वेगळे असतात. अगदी त्यानुसारच मुलाचे किंवा मुलीचे लग्न असो अथवा नातवाचा वाढदिवस, सर्व काही भव्य आणि दिव्य.
मुकेश अंबानी यांच्या नातवाचा वाढदिवस जामनगर मध्ये शाही पद्धतीने साजरा झाला. आकाश अंबानी यांचा पुत्र पृथ्वी अंबानीचा जन्म १० डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील अंबानी यांच्या घरी झाला होता. आकाश आणि श्लोका यांनी त्याचे नामकरण करून नावाची घोषणा केली होती.
पृथ्वीच्या वाढदिवसानिमित्त नेदरलँडहून खेळणी मागविण्यात आली. इटली आणि थायलंड येथून आचारी, मुंबईहून केक तसेच गुजरात येथील पुरोहितांना आमंत्रित करण्यात आले. मुकेश अंबानी हे आशियामधील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि त्यांच्या नातूचा वाढदिवस जामनगरच्या रिसॉर्टमध्ये साजरा करण्यात आला. आकाश आणि श्लोका यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाची भव्य तयारी केली.
वाढदिवसाला सेलिब्रेटी
जामनगरमधील या भव्यदिव्य समारंभात सहभागी होण्यासाठी क्रिकेटपटू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि झहीर खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलेब्रिटीज सहभागी झाले.
केकसाठी विशेष विमान
पृथ्वी अंबानीला शंभर ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले. वाढदिवसासाठी मुंबईहून केक मागविण्यात आला. इटली आणि थायलंडचे आचारींनी स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनविले. आई श्लोकाने आपल्या लाडक्या मुलासाठी नेदरलँडहून खेळणी मागविली. मुंबईहून ताजा केक जामनगरला पोहोचवण्यासाठी एका विशेष विमान सज्ज ठेवण्यात आले होते.