India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टाटांनी लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

India Darpan by India Darpan
September 28, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  तुम्ही तुमची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. टाटा मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. ही कार अवघ्या ५७ मिनिटात चार्ज होईल आणि एकदा चार्जिंग केल्यावर ३१५ किमीची रेंज देईल. या कारचे बुकिंग येत्या १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर, जानेवारी २०२३ पासून या कारचे वितरण केले जाईल.

Tata has indeed done a great job by offering the Tata Tiago EV a price in an accessible range.#TiagoEV pic.twitter.com/6w6xf4pHUi

— Tipu (@TipuVaranasi) September 28, 2022

एकूण ७ प्रकारात उपलब्ध
टाटा कंपनीने ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ७ प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग पर्यायांसह ती उपलब्ध असेल. त्यात XE, XT, XT, XZ+, XZ+Tech LUX, XZ+ आणि XZ+Tech LUX व्हेरियंटमध्ये येईल. त्याच वेळी, १९.२ KWh ते २४ KWh पर्यंतच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल. यामध्ये ३.३ KV AC ते ७.२ KV AC पर्यंत चार्जिंग पर्याय मिळतील. या कारची किंमत ८.४९ लाखांपासून ११.७९ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

अशी आहेत वैशिष्ट्ये
– टियागो इलेक्ट्रिक कारमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड मिळतील. ही कार अवघ्या ५.७ सेकंदात ० ते ६० kmph चा वेग पकडेल. यात ८ स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही मिळते.
– टाटा मोटर्सच्या दाव्यानुसार, ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या कारला १,६०,००० किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल. कारच्या पहिल्या १० हजार बुकिंगपैकी २ हजार युनिट्स विद्यमान टाटा ईव्ही वापरकर्त्यांसाठी राखीव असतील.
– कारच्या बॅटरी आणि मोटर्सवर ८ वर्षे आणि १,६०,००० किमीची वॉरंटी देत ​​आहे. कार १९.२ KWh बॅटरी पॅकवर २५०km आणि २४ KWh बॅटरी पॅकवर ३१५km ची रेंज देईल. तुम्ही ते घरच्या १५A सॉकेटमधून चार्ज करू शकाल.

Say hello to our 1st electric hatch- Tata Tiago.ev!

Introductory price starts at ₹ 8.49 Lakh* for the 1st 10,000 customers.
Out of the 10,000 customers, we have reserved 2000 only for our very own EV fam! 🫶🏻

Register now: https://t.co/oTSY2DyZSi#Tiagoev #EvolveToElectric pic.twitter.com/hOF2gk3MpQ

— Tata Passenger Electric Mobility Limited (@Tatamotorsev) September 28, 2022

Indias first Cheapest Tata Tiago EV Car Launch


Previous Post

सोशल मिडियात मेसेज फॉरवर्ड करताय? आधी हे वाचा…

Next Post

अंबरनाथ-बदलापूर परिसराच्या विकास कामांबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

अंबरनाथ-बदलापूर परिसराच्या विकास कामांबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group