India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोदी सरकारच्या कार्यकाळात रुपया किती रुपयांनी घसरला? अशी आहे ८ वर्षांची आकडेवारी

India Darpan by India Darpan
July 26, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुपयाची डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण सुरूच आहे. आज रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. चालू वित्तीय वर्षात रुपयाची आतापर्यंत सात टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली असून, संसदेच्या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रुपया घसरणीची आकडेवारी समोर आणली होती. रुपयाची होत असलेली घसरण पाहता ती आटोक्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान केंद्र सरकारपुढे उभे राहिले आहे.

गेल्या आठ वर्षात रुपयाची ३७ टक्के घसरण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर रुपया मजबूतीसह ५८.४० रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला होता. आठ वर्षानंतर रुपया आता ८० रुपयांवर पोहोचला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात २१.६० रुपयांच्या घसरणीसह रुपयांत ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. सत्तेत येण्यासाठी मोदी सरकारने रुपया घसरणीचा मुद्दादेखील केंद्रस्थानी ठेवला होता. परंतु, मोदी सरकारलाच आता रुपयाच्या घसरणीवरुन विरोधकांच्या टिकेला तोंड द्यावे लागत आहे.

रुपया घसरण्याचे कारण काय याविषयीही अनेक चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. नुकतेच लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीदेखील यावर भाष्य केलं. रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, प्रतिकूल आंतरराष्ट्रीय आर्थिक समीकरण ही रुपयाच्या घसरणीमागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ भारतीय रुपयाच नव्हे तर पाउंड, येन आणि यूरो चलनात देखील कमजोर होत असल्याचं स्पष्टीकरण सीतारमण यांनी दिले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ निर्यातदारांना होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंना अधिक किंमत मिळते. मात्र, आयातदारांना फटका बसतो. चढ्या भावाने वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे वस्तू महाग होतात आणि सर्वसामान्यांना या महागाईचा फटका बसतो. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातून परकीय कर्ज घेणाऱ्या देशांना व्याजापोटी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. त्यामुळे रुपयाची घसरण आटोक्यात असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Indian Rupees Fall Modi Government Last 8 years Figure


Previous Post

‘परदेशात एक एकरात ३० क्विंटल सोयाबीन होतं अन् भारतात अवघे ४ क्विंटल’ आपली कृषी विद्यापीठे काय करतात?

Next Post

कृषी अधिकाऱ्याकडे सापडले मोठे घबाड; सीबीआयने केली कारवाई

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

कृषी अधिकाऱ्याकडे सापडले मोठे घबाड; सीबीआयने केली कारवाई

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group