India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतीय रेल्वेने या कंपनीला दिले २६ हजार कोटीचे कंत्राट; ११ वर्षे करणार याची निर्मिती

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने सिमेन्स इंडियाला, ९००० एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह म्हणजे इंजिन तयार करण्यासाठीचे कंत्राट दिले आहे. दाहोदच्या रेल्वेच्या कारखान्यात १२०० उच्च अश्वशक्तिची (९०००एचपी) ही इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन पुढच्या ११ वर्षांसाठी तयार केले जातील. या अंतर्गत १२०० लोकोमोटिव्हचे उत्पादन आणि पुढची ३५ वर्षे या लोकोमोटिव्हची देखभाल केली जाणार आहे. कर आणि किमतीतील फरक वगळता या कंत्राटाचे अंदाजे मूल्य २६००० कोटी (सुमारे ३.२ अब्ज डॉलर्स) इतके आहे.

या कंत्राटाचे पत्र जारी झाल्यानंतर ३० दिवसांत, सिमेन्स इंडिया सोबत, एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. येत्या दोन वर्षात, नमूना इंजिन तयार करून दिले जातील. तसेच, या लोकोमोटीव्हचे उत्पादन करण्यासाठी, दोन वर्षात दाहोदचा कारखाना पूर्णपणे तयार केला जाईल. त्यासाठी, तंत्रज्ञान भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली सिमेन्स कंपनी, दाहोद इथे, ही इंजिने तयार करेल आणि विशाखापट्टणम, रायपूर, खरगपूर आणि पुणे या चार ठिकाणी असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती डेपो मध्ये पुढची ३५ वर्षे त्यांची देखभाल करण्याचे कामही हीच कंपनी करेल, त्यासाठी रेल्वेचे मनुष्यबळ वापरले जाईल. या उत्पादनाचे संपूर्ण स्वदेशीकरण सुनिश्चित झाल्यावर इथल्या सहाय्यक/पूरक उत्पादन युनिट्सचा विकास होईल आणि तो खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ चा उपक्रम ठरेल. या प्रकल्पामुळे दाहोद क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल.

हे उच्च अश्वशक्तिचे इंजिन्स (९००० HP) भारतीय रेल्वेवरील मालवाहतुकीसाठी भविष्यातील कार्यशक्ती ठरतील. हे इंजिन प्रामुख्याने ४५०० टन कंटेनर मालवाहू गाड्या ७५ किमी प्रतितास या २०० ग्रेडियंटमध्ये एक मध्ये दुहेरी स्टॅक कॉन्फिगरेशनमध्ये नेण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील. या इंजिनामुळे अशा मालवाहू गाड्यांची सरासरी गती, विद्यमान २०-२५ किमी प्रतितासांपासून सुमारे ५०-६० किमी प्रतितास पर्यंत वाढणे अपेक्षित आहे. मालवाहू रेल्वेच्या कार्यान्वयानात झालेली ही लक्षणीय सुधारणा, उत्पादकता आणि रेल्वेलाइन क्षमता देखील वाढवेल. अत्याधुनिक IGBT आधारित प्रोपल्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन पुनर्जीवन ब्रेकिंग तंत्रज्ञानामुळे ऊर्जावापरात बचत करणारेही ठरतील.


Previous Post

पालकमंत्री दादा भुसेंच्या अडचणी वाढणार; बोरी-आंबोदरी प्रकल्पग्रस्त काढणार हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

Next Post

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर – डॉ. विजयकुमार गावित

Next Post

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ८५ हजार घरकुले मंजूर - डॉ. विजयकुमार गावित

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group