व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विश्‍वचषकाच्‍या सेमी फायनलमध्‍ये असा पोहोचेल चौथा संघ….भारतासोबत कोण लढणार?..बघा अभ्यासपूर्ण विश्लेषण

India Darpan by India Darpan
November 9, 2023 | 10:52 am
in मुख्य बातमी
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्‍क –
आता विश्‍वचषकातल्‍या सेमी फायनलमध्‍ये पोहाचणारा चौथा संघ कोणता? याचे कांउटडाउन आता सुरू झाले आहे. भारत (१६ गुण), द.आफ्रीका (१२ गुण) आणि ऑस्‍ट्रेलिया(१२ गुण) यांनी आपआपले सीटस् बुक केले असून चौथ्या स्‍थानासाठी मात्र न्‍युझीलंड, पाकिस्‍तान आणि अफगाणिस्‍तान या तिघांमध्‍ये चुरस आहे. या तिघांच्‍या नावासमोर प्रत्‍येकी ८ समसमान गुण आहेत. या तीनही संघाचा प्रत्‍येकी एक सामना अद्याप खेळायचा बाकी आहे आणि शेवटी रनरेटच्‍या आधारे सेमी फायनलमध्‍ये प्रवेश मिळवायचा असेल, तर सर्वात आधी या तीनही संघांना त्‍यांचा उरलेला एक सामना हा जिंकावाच लागणार आहे. असे झाल्‍यास प्रत्‍येकाचे १० गुण होतील आणि अखेरीस ज्‍याचा रनरेट जास्‍त तो पुढे जाईल.

या तिघांचे कोणकोणते सामने आहेत ते आता बघुया –
९ नोव्‍हेंबरला – न्‍युझीलंड विरूध्‍द श्रीलंका यांच्‍यात सामना होतो आहे. श्रींलंकेची या स्‍पर्धेतील सुमार कामगिरी पहाता न्‍युझीलंडसाठी ही पहिली पायरी सोपी ठरणार आहे. अर्थात, हा विजय मिळवितांना न्‍युझीलंडची नजर ही त्‍यांचा रनरेट सुधारण्‍याकडे देखील रहाणार आहे हे लक्षात ठेवावे लागेल.

१० नोव्‍हेंबरला – अफगाणिस्‍तान आणि द.आफ्रीका यांच्‍यात लढत होईल. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष राहील. द.आफ्रीका संघ बलाढ्य आहे आणि याआधीच सेमी फायनल मध्‍ये पोहोचला देखील आहे. परंतु, या स्‍पर्धेत अफगाणिस्‍तान संघाने ज्‍या पध्‍दतीने आश्‍चर्यकारक कामगिरी केली आहे ती पहाता या सामन्‍याच्‍या निकालाचे भविष्‍य वर्तविणे अवघड आहे. या सामन्‍यात पराभव झाल्‍यास द.आफ्रीकेला काहीही फरक पडणार नसला तरी या सामन्‍यातील विजयाने अफगाणिस्‍तान क्रिकेटचे मात्र विश्‍व बदलून जाणार आहे हे निश्‍चीत. रशिद खान आणि त्‍याची टीम काहीही करू शकते हा आत्‍मविश्‍वास या सामन्‍याच्‍या निकालावर परिणामकारक ठरणार आहे. शिवाय ज्‍या द.आफ्रीका संघाचा पराभव नेदरलॅण्ड संघ करू शकतो तिथे अफगाणिस्‍तान संघाची काय बात?.

११ नोव्‍हेंबरला- पाकिस्‍तानचा संघ इंग्‍लडसोबत लढणार आहे. पाकिस्‍तानसाठी हा एक जुगार असेल. विश्‍वविजेत्‍या इंग्‍लडला २०२३ च्‍या विश्‍वचषकात सुर सापडलेला नाही हे जरी खरे असले तरी अगदीच काही न कमावता त्‍यांना मायदेशी परतायला आवडणार नाही. नेदरलॅण्ड आणि श्रीलंका या दोन सामन्‍यातील विजयाचे गुण त्‍यांच्‍या खात्‍यावर आहेत, पण पाकिस्‍तानसारख्‍या एका बलाढ्य संघाला देखील आम्‍ही परत येता-येता पराभूत करून आलोय असे विशेषण लावून हा संघ परतला तर चाहत्‍यांना नक्‍कीच आवडेल. अर्थात, पाकिस्‍तान संघात देखील इंग्‍लडसमोर कडवे आव्‍हान उभे करायची ताकद आहे. क्रिकेट हा चमत्‍कारिक खेळ आहे. त्‍यामुळे, विश्‍वचषकाच्‍या या शेवटच्‍या टप्‍यात काही चमत्‍कार झाला तर पुढे येणारा ‘भूकंप’ कसा असेल याचा विचार आताच न केलेला बरा.

अर्थात, या गणितातली वजाबाकी अशी आहे की या तिघांपैकी जो संघ त्‍याच्‍या सामन्‍यात पराभूत होईल त्‍याचे आव्‍हान देखील तिथेच संपुष्‍टात येईल. मात्र या तिघांनी जोश दाखवून त्‍यांच्‍या लढती जिंकल्‍याच तर पुढचे भवितव्‍य रनरेट ठरवील. आजमितीला रनरेटचा विचार केल्‍यास न्‍युझीलंड पुढे असून त्‍यानंतर पाकिस्‍तान आणि नंतर अफगाणिस्‍तान संघाचा नंबर लागतो.

भारताचा सामना या संघाबरोबर
आणखी एक महत्‍वाची गोष्‍ट, या तिघांपैकी जो कोणता संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल त्‍याच्‍यासोबत भारताची लढाई होईल. २ आणि ३ क्रमांकावर असलेल्‍या द.आफ्रीका आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातली सेमी फायनल निश्‍चीत झाली असून १६ नोव्‍हेंबरला या दोघांमध्‍ये कोलकात्‍याच्‍या ईडन गार्डन्‍समध्‍ये लढत होईल. पहिल्‍या क्रमांकावर असलेल्‍या भारतीय संघात आणि साखळीतले उरलेले दिव्‍य पार करून जो चौथा संघ येईल त्‍यांच्‍यात मात्र त्‍याआधीच, म्‍हणजे १५ नोव्‍हेंबरला मुंबईत लढत होईल.
4th Team To Reach World Cup Semi Finals….Who Will Fight With India?..Watch Insightful Analysis


Previous Post

महाराष्ट्रात आज यलो ॲलर्ट……दोन दिवसांपासून अचानक हवामान बदल

Next Post

नाबाद २०१ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे भारताचा जावई…बघा कोण त्याची पत्नी

Next Post

नाबाद २०१ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे भारताचा जावई…बघा कोण त्याची पत्नी

ताज्या बातम्या

सरकारमध्ये सहभागी झालो असलो तरी..अजित पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

November 30, 2023

प्रसूतीपूर्व लिंग निदान केल्यास या टोल फ्री नंबरवर करा तक्रार…. असे मिळणार तक्रारदाराला १ लाख रुपयाचे बक्षीस

November 30, 2023

पाच राज्याचे एक्झिट पोल आले समोर… भाजपला धक्का, काँग्रेसला तीन राज्यात संधी

November 30, 2023

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.