सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आयोजित राज्य ज्यूदो लीग स्पर्धेत शिवनेरी किंग्सला विजेतेपद तर तोरणा टायगर्सला उपविजेतेपद

by India Darpan
ऑगस्ट 13, 2024 | 7:15 pm
in स्थानिक बातम्या
0
SHIVNERI


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आणि मित्र विहार संस्था, यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजीत ३ ऱ्या राज्यस्तरिय चॅम्पियन लीग स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. या स्पर्धेत शिवनेरी किंग संघाने आपला दबदबा कायम राखत अंतीम लढतीत तोरणा टायगर्सचा ४ विरुद्ध १ असा पराभव करून या लीगचे विजेतेपद पटकावले. या अंतीम सामन्यात पहिल्या दोन लढतीत चांगलीच चुरस दिसून आली.

पहिल्या सामन्यात तोरणा टायगर्सच्या सई जगतापने शिवनेरी किंग्सच्या प्रणालीला पराभूत करून विजय प्राप्त केला आणि १-० अशी आघाडी मिळविली. मात्र दुसऱ्या सामन्यात शिवनेरीच्या ओम पाटीलने जोमाने सुरवात करून तोरणा टीजर्सच्या पार्थ नागरेला पराभूत करून आपल्या संघाला १ – १अशी बरोबरी मिळवून दिली. या विजयामुळे उत्साहित झालेल्या रायगड किंगच्या खेळाडूंनी पुढील तीन लढतीत सुंदर खेळ करून विजय प्राप्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शिवनेरोच्या वैशाली पाटील, सनी रानमाळे शुभांगी राऊत यांनी सुंदर खेळ करून विजय संपादन करत आपल्या संघाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. या कामगिरीमुळे शिवनेरी किंगने या स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले. या स्पर्धेत अंकाई अटॅकर्सने तीसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकचे आमदार आणि माझी राष्ट्रीय ज्यूदो खेळाडू राहुल ढिकले, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटिल, ज्येष्ठ ज्युदो संघटक डॉ.रत्नाकर पटवर्धन, मा. प्राचार्य कैलास पाटील, प्रशिक्षक विजय पाटिल, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अतुल शेलार, प्रसाद मोकाशी, तुषार माळोदे यांच्या हस्ते पार पडला. विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम आणि आकर्षक चषक आणि मेडल्स प्रदान करून सन्मानित कऱण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले की नाशिकच्या ज्युदो प्रशिक्षक आणि संघटक यांनी या वैयक्तिक खेळाला सांघिक स्वरूप देवून चांगले पाऊल उचलले आहे. खेळाडूंना याचा फायदा होईल आणि त्यांना चांगली प्रगती करता येईल. त्यामुळे हा उपक्रम राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे सांगितले. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पुणेचे संदीप कोंडे आणि त्यांचे सहकारी यांनी यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, राज्य ज्युदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेतकर, तुषार माळोदे, माधव भट, सुहास मैंद, वाघचौरे आणि सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
१) शिवनेरी किंग – विजेता.२) तोरणा टायगर्स – उपविजयी. ३) अंकाई अटॅकर्स – तीसरा क्रमांक.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर…अनुराधा पौडवाल यांच्यासह यांना मिळाला पुरस्कार

Next Post

जळगावमध्ये महिला सक्षमीकरण मेळावा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या या घोषणा

Next Post
Eknath Shinde e1714057426383

जळगावमध्ये महिला सक्षमीकरण मेळावा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या या घोषणा

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011