शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून या ठिकाणी युवकांची नियुक्ती सुरू

by India Darpan
जुलै 29, 2024 | 11:32 pm
in इतर
0
WhatsApp Image 2024 07 29 at 8.18.23 PM 1140x570 1

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना नियुक्तीपत्र देऊन या प्रशिक्षण योजनेची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात जिल्ह्यात आज करण्यात आली.

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा यादृष्टीने ही ६ महिन्यांच्या नियुक्तीची योजना आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे घडविता येणार आहे.

आज दुपारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे पहिले कार्यादेश प्रदान करण्यात आले.सुप्रसाद सूर्यकांतराव दामेकर, देगलूर, अंजली राजेंद्र आवतिरक, पाथरड रेल्वे, ता. मुदखेड, विश्वजीत रंजू खानसोळे, ओमकेश्वर संतोष कुमार उपलवाड असे कार्यादेश दिलेल्या या चार उमेदवारांचे नाव आहे. यापैकी सुप्रसादला तहसील कार्यालय देगलूर तर अन्य तीन उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी कामकाज सोपविण्यात आले आहे.

या प्रतिनिधीक व छोटेखाली कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

ही कार्य प्रशिक्षण योजना 6 महिन्यासाठी असून रितसर नोंदणी करुन रुजू झालेल्या बारावी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय/पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदविधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल. बारावी, आय. टी. आय. पदविका, पदवीधर व पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जावून आपल्या लॉगिन आयडी पासवर्ड च्या माध्यमातून पोर्टलवर CMYKPY अंतर्गत नोंदविलेल्या विविध रिक्तपदांना ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होऊ शकते, जाणून घ्या, मंगळवार, ३० जुलैचे राशिभविष्य

Next Post

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री रमले शालेय आठवणीत…

Next Post
Capture1 1 749x375 1

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री रमले शालेय आठवणीत…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011