रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिडकोतील उत्तमनगर भागात घरफोडी…रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास

by India Darpan
जुलै 28, 2024 | 1:10 am
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोतील उत्तमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे ४५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात १५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश रमेश सुर्वे (रा.सर्वेश्वर चौक,उत्तमनगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुर्वे कुटूंबिय दि.२३ ते २६ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.

चोरट्यांनी मशनरी चोरून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फॅब्रीकेशन कारखान्याचा पत्रा उचकटून चोरट्यांनी मशनरी चोरून नेली. ही घटना औद्योगीक वसाहतीतील तलाठी कार्यालय भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राघवेंद्र कुमार सिंग (रा.माऊली चौक,दत्तनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग यांचा अंबड औद्योगीक वसाहतीतील तलाठी कार्यालय परिसरात शक्तीमान मशनरी अ‍ॅण्ड फेब्रीकेशन नावाचा कारखाना आहे. गेल्या शनिवारी (दि.१३) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद शॉपच्या दरवाजाचा पत्रा उचकटून कारखान्यातील दोन ग्रॅण्डर मशिन व गॅस कटर मशिन सिलेंडरसह चोरून नेले. अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.

तलवार बाळगणा-यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदूर जत्रा हॉटेल लिंकरोड भागात तलवार बाळगणा-यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून धारदार लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा विष्णू काळे (२१ रा.महादेव मंदिराजवळ,शिवमुद्रा चौक इच्छामणीनगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तलवारधारीचे नाव आहे. नांदूर जत्रा लिंकरोडवरील गणेश मार्केट भागात असलेल्या एकाकडे तलवार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२६) आडगाव पोलीसांनी धाव घेत सेल्फी पॉईंट भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या अंगझडतीत मिळालेली तलवार जप्त करण्यात आली असून याबाबत अंमलदार दिनेश गुंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आईच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी लावले झाड…पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Next Post

धक्कादायक….तब्बल २५ महिलांची लग्न करणा-याला पोलिसांनी केले गजाआड

Next Post
jail1

धक्कादायक….तब्बल २५ महिलांची लग्न करणा-याला पोलिसांनी केले गजाआड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011