मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे. शिवसेनेकडून दोन वेळा ते आमदार होते. पण, २०१९ मध्ये रमेश कुथे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर घरवापसी केली. त्यामुळे गोंदियात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
रमेश कुथे हे १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होते. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला.