सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा…ही मागणीही केली मान्य

by India Darpan
जुलै 19, 2024 | 2:41 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sharad Pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगाने अगोदर निधी घेण्यास मान्यता दिल्यानंतर आता शरद पवार गटाला आणखी मोठा दिलासा दिला आहे. अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेत झालेले नुकसान आता विधानसभा निवडणूकीत होणार नाही. सारखे चिन्ह असल्यामुळे अगोदरच शरद पवार गटाने तक्रार केली होती. पण, त्यावेळेस दखल घेतली नाही. आता त्याची दखल घेण्यात आली.

तुतारी आणि पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे मतदारांचा होणारा गोंधळ पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यातून हा दिलासा मिळाला आहे.

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना पिपाणी चिन्ह देण्यात आले होते. त्यांना पिपाणी चिन्ह असलेल्या राज्यातील अपक्ष उमेदवारांत सर्वाधिक तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

सातारा लोकसभा मतदारसंघात ३७ हजार मते अपक्ष उमेदवाराच्या ‘पिपाणी’ला पडली. शरद पवार गटाने लढवलेल्या दहा लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवारांना तब्बल चार लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. त्यामुळे विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका वाटल्याने शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला होता. बीडमध्ये पिपाणी चिन्ह असलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला ५४ हजार ८५० मते, बारामती मतदारसंघात सोयलशाह शेख या उमेदवाराला १४ हजार ९१७ मते, तर नगरमध्ये पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला ४२ हजार मते मिळाली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय नौदलात नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून बंटी बबलीने तीन लाखाला घातला गंडा…कोर्टाच्या आदेशान गुन्हा दाखल

Next Post

खासगी शाळांना वगळण्याच्या या आदेशाला स्थगिती….उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

Next Post
court 1

खासगी शाळांना वगळण्याच्या या आदेशाला स्थगिती….उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011