इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गाचा शेवटच्या चौथ्या टप्पाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून आता सप्टेंबर महिन्यात हा महामार्ग सुरु होणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी वाहतुकीसाठी हा महामार्ग सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. ७६ किलोमिटरचा हा टप्पा इगतपुरी ते ठाणे आमना पर्यंत आहे. हा शेवटचा टप्पा सुरु झाल्यानंतर १२० किलोमीटर प्रतीतास वेगाने धावणार वाहने, ६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार आहे.
सध्या ६२५ किलोमीटरचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्याचे उदघाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिर्डी ते भरवीरपर्यंतचा दुस-या टप्याचे उदघान मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर या वर्षी अतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते इगतपुरी शहरादरम्यानचा २५ किलोमीटराचा रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे एकुण ७०१ किमीचा हा रस्ता पूर्णपणे सुरु होणार आहे.
हा महामार्ग सुरु झाल्यानंतर नाशिकहून मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.