नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कॉम्रेड माधवराव गायकवाड सहाव्या स्मृती जीवनगौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, डॉ भालचंद्र कांगो ( संभाजी नगर) निवड केली आहे. रोख रक्कम ५१ हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सदर पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात कर्मभूमीत संभाजीनगर येथे कॉ. माधवराव गायकवाड बाबूजी स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणारं आहे. या आधी हा पुरस्कार खा. राजू शेट्टी, कॉ. एम ए पाटील, कॉ. मोहन शर्मा, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. सूकुमार दामले , माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक येथे संस्थेच्या अध्यक्षा अॅड. साधना गायकवाड, सचिव कॉ. राजू देसले, यांनी दिली. विश्वस्त भास्कर शिंदे, दामू अण्णा पाटील, श्याम गरुड, व्ही डी धनवटे, सुभाष बेदमुथा, छबूशेट शिरसाठ, दत्तू तुपे, रिखब जैन, निखिल स्वर्गे, डॉ रामदास भोंग, देविदास भोपळे, साहेबराव गंभीरे किरण डावखर होते.
कॉ. माधवराव गायकवाड जयंती शतक महोत्सव वर्ष १८ जुलै ते १८ जुलै २०२५ राज्यभर साजरे केले जाणार आहे. या निमीत्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव ग्रंथ संपादित करण्यात येणार, विवीध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात करण्यात आहेत. महाराष्ट्र राज्य चे पहिले विरोधी पक्षनेते विधान परिषद होते. डॉ भालचंद्र कांगो यांची वयाची ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यात कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. ए बी बर्धन, कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांना कॉ. माधवराव गायकवाड यांच्या सुवर्ण जयंती महोत्सव वर्षी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही पूर्णवेळ चळवळी साठी आयुष्य वेचणारे नेते डॉ भालचंद्र कांगो यांचा गौरव करताना आनंद होत आहे.
डॉ. भालचंद्र कांगो यांचा परिचय
श्री भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सचिव आहेत.सुरवातीपासूनच मार्क्सवादावर त्यांची निष्ठा आहे. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून १९७४ साली MBBS पदवी मिळवून डॉक्टर झाले पण त्या विद्यार्थी दशेपासूनच साम्यवादी विचारांनी प्रेरित होऊन चळवळीत सहभागी झाले. ते मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून निवडून आले आणि १९६८ ते १९७४ या काळात युवक क्रांती दलाचे सदस्य होते. श्री. भालचंद्र कानगो हे कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरले आणि संघर्षात ते अग्रेसर राहिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात आणि मराठवाड्यातील रेल्वेच्या ब्रॉडगॅगेज परिवर्तनाच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. विविध आंदोलनांसाठी त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला.
ते १९७५ मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेस (AITUC )मध्ये आणि १९७८ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. त्यांनी १९९५ ते २००४ पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्याचे संयुक्त सचिव आणि २००५ ते २०१५ पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे राज्य सचिव म्हणून काम केले आणि आता २०१८ पासून सीपीआयचे ते राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत.
कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचा असा होता प्रवास
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे १२ नोव्हेंबर २०१८ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात ही छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष होते. २५ वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे ८ शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत,नांदगाव विधानसभेचे आमदार, ६ वर्ष विधांपरिषेद, विरोधी पक्षनेते, भाकपचे १२ वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे १५ वर्ष अध्यक्षपद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत ७५ वर्ष योगदान दिले आहे.