इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षण प्रकरणी राज्यभर आंदोलन केले जात असून मनमाडमध्ये थेट लोटांगण घातल विजय मढे यांनी सरकारचे लक्ष वेधले. मढे धाबा ते नगरपालिकेतर्फे या कार्यकर्त्याने लोटांगण घातले. विशेष म्हणजे ढोल ताशाच्या गजरात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे अतंरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली रहावी यासाठी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता येथील चांदीच्या गणपतीची महाआरती करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी मनमाड बंद पुकारण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात रस्ता रोको, ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा, साखळी उपोषण, टायर जाळणे, जोडे मारो आंदोलन, गावबंदी, प्रतिकात्मक अंत्ययात्रा यासारखे आंदोलन ठिकठिकाणी बुधवारी झाले. तर आजही आंदोलन सुरुच आहे.