इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोणत्याही चित्रपटात काम करणा-या कलाकारांना मोठी प्रसिध्दी मिळते. ते लोकप्रियही होतात. त्यांच्या अभिनयाचे कौतुकही केले जाते. पण, त्यांच्या या सर्व कामांत किती मेहनत त्यांना घ्यावी लागते. हे फारसे समोर येत नाही. प्रसिध्द अभिनेत्री कृती सनॉनने इन्स्टाग्राममध्ये एका व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तीची अॅक्शन सीनसाठी केलेली मेहनत तीच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे तीचे कौतुकही होत आहे.
कृती सनॉनने २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तीने हिरोपंती या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिरोपंतीमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१५ सालच्या दिलवाले ह्या चित्रपटात देखील कृती आघाडीच्या भूमिकेत चमकली.
कृतीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्ली येथे राहुल सनॉन या चार्टर्ड अकाउंटंट आणि गीता सनॉन या दिल्ली विद्यापीठाचे भौतिकशास्त्र प्राध्यापक यांच्याकडे झाला. तिचे कुटुंब पंजाबी आहे. तिला एक छोटी बहीण असून तिचे नाव नूपुर सनॉन आहे. तिने दिल्ली पब्लिक स्कूल, आर के पुरम येथे शिक्षण घेतले आणि नंतर नोएडाच्या जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी मिळविली.
तीचे हीरोपंती, दिलवाले,लुका चुप्पी, हाउसफुल 4, हम दो हमारे दो, मिनी याबरोबरच अनेक चित्रपट प्रसिध्द आहे. अशा कृती सनॉनचा हा व्हिडिओ नक्की बघा…..