व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबई, नागपूर, वाराणसी येथून ११ जणांना अटक….इतक्या कोटीचे सोने जप्त

India Darpan by India Darpan
October 15, 2023 | 8:19 pm
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जमीन आणि रेल्वे मार्गांद्वारे परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी डीआरआयच्या पथकाचा समावेश असलेल्या आणि अतिशय काळजीपूर्वक,नियोजित आणि सुव्यवस्थितपणे केल्या गेलेल्या या कारवाईत ३१.७ किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे १९ कोटी रुपये आहे.

विशिष्ट गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करून, नागपूर डीआरआयच्या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले. त्यांच्याकडून ८.५ किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर डीआरआयच्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले.

वाराणसी येथील डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर ३ तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्या दोघांकडून आणि कारच्या हँडब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे १८.२ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन गेलेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून ४.९ किलोग्रॅम सोने जप्त केले.

या आरोपींच्या चौकशीत असे उघड झाले की, ही टोळी बांगलादेशच्या सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करत असे आणि पुढे ते मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे ते सोने विक्रीसाठी पाठवले जायचे. योग्य परिश्रम आणि समन्वित कारवाईच्या योजनेसह, डीआरआयने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण ११ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेले लोक सोन्याच्या तस्करी करणाऱ्या टोळीच्या सर्व स्तरावरील म्हणजे वाहक/प्रवासी, हँडलर आणि तस्करीच्या सोन्याचे अंतिम प्राप्तकर्ते अशा सर्व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत.

देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या टोळीचा शोध लावण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची डीआरआयची सातत्यपूर्ण क्षमता या कारवाई द्वारे सिद्ध होते. संपूर्ण भारतातील अशा कारवाई मध्ये विविध तपास यंत्रणांचे आपसातील सहकार्य सुद्धा अधोरेखित झाले आहे.


Previous Post

भाजपचे वाढले टेन्शन… दिग्गज नेत्यांच्या मुलांनाच हवे या निवडणुकीचे तिकीट….राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

Next Post

पंतप्रधानांनी केले अमिताभ बच्चन यांना या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन

Next Post

पंतप्रधानांनी केले अमिताभ बच्चन यांना या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.