India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कांगारुंचा धु्व्वा! टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; कसोटीसह जिंकली मालिका

India Darpan by India Darpan
February 19, 2023
in Short News
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  भारतीय संघाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 113 धावांवर गारद झाला आणि भारतासमोर 115 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने तिसर्‍याच दिवशी चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी  उपाहारापर्यंत टीम इंडियाने एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर होते. केएल राहुलची बॅट पुन्हा चालली नाही. उपाहारापूर्वी एका धावेच्या वैयक्तिक धावसंख्येवर नॅथन लायनने त्याला बाद केले.

In his 1️⃣0️⃣0️⃣th Test, @cheteshwar1 finishes off the chase in style 🙌🏻#TeamIndia secure a 6️⃣-wicket victory in the second #INDvAUS Test here in Delhi 👏🏻👏🏻

Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8@mastercardindia pic.twitter.com/Ebpi7zbPD0

— BCCI (@BCCI) February 19, 2023

रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावांत गुंडाळला गेला. कुहनमनने दोन चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. तो क्लीन बोल्ड झाला. या डावात जडेजाने सात तर अश्विनने तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात एक धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारतासमोर 115 धावांचे लक्ष्य होते. आता टीम इंडिया अवघड खेळपट्टीवर सावध फलंदाजी करून लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या खेळपट्टीवर अधिक बचावात्मक शैली उपयुक्त ठरणार नाही. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांनी यश मिळविले आहे.

Just @imjadeja things 🫡🫡#INDvAUS pic.twitter.com/6wm0OeykQn

— BCCI (@BCCI) February 19, 2023

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी सुरेख अर्धशतके झळकावली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने खराब सुरुवात करूनही २६२ धावा केल्या. अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि अश्विनसोबत शतकी भागीदारी केली. विराट कोहलीनेही 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने पाच बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 113 धावांत गारद झाला. जडेजाने सात आणि अश्विनने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त मार्नस लबुशेन (35) दुहेरी आकडा गाठू शकला. आता भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य आहे.

2️⃣-0️⃣ ✅@cheteshwar1 with the winning runs as #TeamIndia register a 6️⃣-wicket win in Delhi 👏👏

Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/1wrCKXPASU

— BCCI (@BCCI) February 19, 2023

India Win 2nd Test and Series against Australia


Previous Post

अजित पवारांसह हसन मुश्रीफ अमित शहांच्या भेटीला; कोल्हापुरात राजकीय हालचाली वाढल्या

Next Post

एकनाथ शिंदेंनी खेळला आणखी एक डाव; उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Next Post

एकनाथ शिंदेंनी खेळला आणखी एक डाव; उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group