इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – यजमान भारतीय संघाबरोबर टक्कर देण्यासाठी पाहूणा असलेला वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आजपासून (६ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये खेळली जाईल, तर 75 टक्के प्रेक्षक टी-20 मालिकेसाठी स्टेडियममध्ये जाऊ शकतील.
असे आहे पूर्ण वेळापत्रक
एकदिवसीय (वन डे) सामने
6 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1:30 पासून,
9 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1:30 वाजता.
11 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1:30 पासून.
टी२० सामने
16 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता – संध्याकाळी 7:30 वाजेपासून
18 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता – संध्याकाळी 7.30 वाजेपासून
19 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता – संध्याकाळी 7:30 वाजेपासून
भारताचा एकदिवसीय संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी मोहम्मद यादव, बी. , प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ असा
डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, ब्रँडन किंग, किरन पोलार्ड (क), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, जेसन होल्डर, शाई होप, निकोलस पूरन, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, केमर रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, हेडन वॉल्श.
भारताचा टी 20 संघ असा
रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, अवनेश्वर खान आणि हर्षल पटेल.
वेस्ट इंडिजचा टी- 20 संघ असा
डॅरेन ब्राव्हो, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, किरन पोलार्ड (क), फॅबियन ऍलन, रेस्टन चेस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, निकोलस पूरन, शाई होप, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, हेडन वॉल्श.