India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतातील इतके टक्के जोडप्यांनी जोडीदाराच्या घोरण्याची तुलना केली थेट मोटरसायकलच्या आवाजाशी

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in राष्ट्रीय
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ३२ टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे असल्याचे सांगतात. भारतीय झोपेच्या गुणवत्तेला किती महत्त्व देतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

सर्वेक्षणातील ६७ टक्के प्रतिसादकांना वाटते की दिवसभरातील कामाच्या थकव्यामुळे जोडीदार घोरतात आणि त्याचा आरोग्य व झोपेच्या दर्जाशी काही संबंध आहे. तसेच जवळपास ४५ टक्के व्यक्तींनी घोरण्यासाठी लठ्ठपणाला कारणीभूत मानले. इतर काही घटक देखील होते, जसे बहुतांश व्यक्तींचा (जवळपास ५५ टक्के) विश्वास आहे की सभोवतालची परिस्थिती न बदलता घोरण्याला सोप्या उपायांनी हाताळले जाऊ शकते.

भारतीयांनी त्यांची जीवनशैली आणि झोपण्याच्या सवयी बदलण्यासाठी परस्पर चर्चेद्वारे झोपेच्या गुणवत्तेचे महत्त्व कसे पाहण्यास सुरुवात केली आहे हे अनेक घटकांनी दाखवले. उदाहरणार्थ, ३६ टक्के व्यक्तींनी शांत झोपेसाठी योग्य मॅट्रेस आणि उशी असण्याचे महत्त्व मान्य केले. तसेच, ७१ टक्के व्यक्तींनी त्यांच्या भागीदारांसोबत घोरण्याच्या समस्येबद्दल बोलण्यास सहमती दाखवली.

सेन्चुरी मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक उत्तम मलानी म्‍हणाले, ‘‘सर्वेक्षणाच्या निष्पत्ती व्यक्तींना घोरण्यासारख्या झोपेसंबंधित समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास जागरूक करतात, कारण त्यांचा आरोग्य व परस्पर संबंधावर परिणाम होऊ शकतो. अपुरी झोप आणि त्याचा आरोग्य व परस्पर संबंधावर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष केले जाते, ज्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. जागतिक निद्रा दिनानिमित्त या सर्वेक्षणाद्वारे व्यक्तींची झोपमोड करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही व्यक्तींना झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड मॅट्रेस व उशांसह उत्तम झोप देणारी उत्पादने देऊन चांगली झोप घेण्यास मदत करत आहोत.’’

बेंगळुरूमधील नोज अॅण्ड सायनस सर्जन डॉ. जगदीश चतुर्वेदी म्हणाले, ‘‘सर्वेक्षणामधून स्पष्टपणे दिसून येते की, अधिकाधिक व्यक्तींना घोरण्यासारख्या त्यांच्या झोपेसंबंधित समस्यांबाबत माहित आहे आणि त्याचा स्वीकार देखील करत आहेत. व्यक्तींनी वैद्यकीय उपचार, अॅण्टीमायक्रोबियल ट्रिटेड व मॅट्रेसेससह उत्तम झोप देणारी उत्पादने अशा हस्तक्षेपांसह झोपेचा दर्जा सुधारत या समस्येच्या निराकरणास सुरूवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. दीर्घकाळापर्यंत घोरण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास आरोग्यावर इतर परिणाम होऊ शकतात.’’
हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, पटणा आणि गुवाहाटी येथील २७ ते ५० वर्ष वयोगटातील २७००हून अधिक प्रतिसादकांमध्ये करण्यात आले.

India Sleep Snoring Survey Report


Previous Post

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सरकारने काढले हे शुद्धीपत्रक

Next Post

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे नाशकात मार्गदर्शन क्लिनिक; सोमवार ते शनिवार याठिकाणी मिळणार मोफत सेवा

Next Post

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे नाशकात मार्गदर्शन क्लिनिक; सोमवार ते शनिवार याठिकाणी मिळणार मोफत सेवा

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group